Bigg Boss 17 Controversy
Bigg Boss 17 Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: अन् ईशाने 'या' सदस्याचे नाव घेत घराबाहेर काढण्याचा घेतला निर्णय

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये विकेंडची खास झलक पाहायला मिळाली. यावेळी सलमान खानसोबत रवीना टंडन आणि अब्दु रोजिक दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर त्यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

याशिवाय ईशा मालवीयाने ऐश्वर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय कसा घेतला हे देखील प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. तिचा हा निर्णय घरातील लोकांना आवडला नसल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

बिग बॉस 17' चा नवीन प्रोमो रवीना टंडनच्या एंट्रीने सुरू होतो. तिने सलमान खानसोबत 'अंदाज अपना अपना' या गाण्यावर डान्स केला. मग अब्दु रोजिक देखील सांता म्हणून प्रवेश करतो. नंतर तिघेही एकत्र स्टेजवर खूप धमाल करतात.

याशिवाय ईशाला कॅप्टन म्हणून अंकिता, ऐश्वर्या आणि अनुराग यापैकी एका सदस्याला घराबाहेर काढण्याचा अधिकार मिळतो. प्रोमोमध्ये दिसत असल्याप्रमाणे ती ऐश्वर्याचे नाव घेतल्याचा अंदाज लावला जात आहे. तिने कोणाचे नाव घेतले हे जरी पाहायला मिळत नसले तरी तिच्या निर्णयानंतर नील आणि रिंकू भडकलेले दिसत असून ईशाने चूकीचा निर्णय घेत असल्याचे म्हणताना प्रोमोमध्ये दिसत आहेत.

मात्र ईशा तिच्या निर्णयावर ठाम असलेली पाहायला मिळाली. आता पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर ईशाने घराबाहेर जाण्यासाठी कोणत्या स्पर्धकाचे नाव घेतले आहे. विकेंडला सलमान कोणाची शाळा घेणार आणि कोणाला शाबासकीची थाप घेणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT