Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात नेहमीच काहीतरी घडताना दिसत असते. कधी कोणी कोणाचा मित्र असतो तर तोच मित्र शत्रूदेखील बनताना दिसतो. घरात ज्या गोष्टी घडतात त्याचे पडसाद बाहेरच्या जगावरदेखील उमटताना दिसतात. आता अभिषेक कुमारचा मित्र माधव शर्मा याने एक मुलाखत दिली आहे, या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अभिषेक, ईशा मालवीय, मुनव्वर फारुकी आणि समर्थ यांच्याबद्दल त्याने सविस्तर आपले मत मांडले आहे. चला जाणून घेऊयात माधव शर्माने काय म्हटले आहे.
माधव शर्मा यांनी 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक कुमारने सिद्धार्थ शुक्लाची कॉपी केल्याच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. . हा शो बघून तो इथे आला नाही की काही शिकलाही नाही. सिद्धार्थ शुक्लाचे सगळेच चाहते आहेत. पण एखाद्या गोष्टीवर त्याला ज्या प्रकारची प्रतिक्रिया येत आहे तशी प्रतिक्रिया कोणाचीही असू शकते. यावरून तो कुणाची कॉपी करतोय असे म्हणता येणार नाही. 13वा सीझन आठवला जातो तसाच सीझन 17 देखील लक्षात राहील असे माधव शर्माने म्हटले आहे.
लोक अभिषेकला म्हणाले होते की जर त्याला ईशा मालवीय येणार आहे हे माहित असते तर तो आला नसता. यावर माधव शर्मा म्हणाले की, 'त्याला शो सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कळले, जेव्हा प्रोमो शूट होत होता. आणि आम्हाला कळालं तरी करिअर बाकी आहे. कॅमेरा चालू असेल तर तुमचा धर्म एकच, तुमचे कर्मही तेच आहे. त्यामुळे ईशा आली तरी त्याला काही फरक पडला नाही. तो शांत होता पण ईशानेच शोमध्ये बाहेरच्या गोष्टी आणायला सुरुवात केली. अभिषेक काहीच बोलला नाही.
ईशा-अभिषेकच्या ब्रेकअपबद्दल बोलताना पूर्णपणे तुटल्याचे माधव शर्माने सांगितले. तो रात्री ३-३ वाजता फोन करायचा की मी एकटा आहे. तर माधव जवळच राहत असल्याने त्याला त्याच्या घरी बोलावत असे. अभिषेकला कुठेही जावं लागलं की तो त्याच्यासोबत जायचा आणि ईशाला माहीत होतं की अभिषेकची मानसिक स्थिती ठीक नाही आणि तिने या सगळ्या गोष्टी बिग बॉसच्या घरात वापरल्या.
याशिवाय मुनव्वरविषयी बोलताना असे म्हणाला की, मुनव्वरला माहित आहे की अभिषेक ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो. त्यामुळेच तो त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
दरम्यान, शोच्या फिनालेला काही दिवसच बाकी आहेत. स्पर्धक चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता कोण जिंकणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करुन घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.