Pathaan Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Pathaan Movie: 'बेशरम रंग'ला वाढत्या विरोधातच आता चित्रपटातील दुसरे गाणे 'या' दिवशी होणार रीलीज...

बिहारमध्ये चित्रपट रीलीज होऊ न देण्याची भाजप नेत्याची धमकी

Akshay Nirmale

Pathaan Movie: बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खानच्या आगामी पठान या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याचा वाद संपण्याचे नावच घेत नाही आहे. बिहारमधील भाजप नेते हरीभुषण ठाकूर बचौल यांनी आता या गाण्याला विरोध म्हणून बिहारमध्ये हा चित्रपट रीलीज करू न देण्याची धमकी दिली आहे.

या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोन हीने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे. त्यावरून देशातील कथित धर्म मार्तंडांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या गाण्याला विरोध केला जात आहे. बचौल म्हणाले की, भगवा रंग हा आमच्या धर्माचे प्रतिक आहे. निर्मात्यांनी सनातन संस्कृती कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्याचा रंग भगवा आहे, आगीचा रंग भगवा आहे. हा बलिदानाचा रंग आहे. प्रतिक आहे.

निर्मात्यांनी या रंगाला बेशरम रंग असे म्हटले आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आणि दुर्दैवी आहे. या चित्रपटात हीरोईन छोट्या ड्रेसमधून अश्लीलतेचा प्रसार करत आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटावर बरिष्काराची मागणी करत आहोत. आम्ही हा चित्रपट बिहारच्या सिनेमागृहांमध्ये रीलीज होऊ देणार नाही. जर रीलीज केला गेला तर सर्व भाजप कार्यकर्ते थिएटरबाहेर आंदोलनाला बसतील.

दरम्यान, हरिभूषण यांच्यावर जनता दल युनायटेड पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी पलटवार करत म्हटले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षाकडे कुठल्याही रंगाचा कॉपीराईट नाही. भाजपने विनाकारण चित्रपटावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

22 डिसेंबरला येणार नवे गाणे...

दरम्यान, एकीकडे या गाण्यावरून सुरू झालेला वाद शमत नसतानाच आता पठान चित्रपटातले दुसरे गाणे रीलीज होणार आहे. निर्मात्यांनी 22 डिसेंबर रोजी चित्रपटातील दुसरे गाणे 'झूमे जो पठान' रीलीज करण्याची घोषणा केली आहे.

लोकसभेतही पडसाद...

या गाण्याच्या वादाचे पडसाद सोमवारी लोकसभेतही उमटले. बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांनी चित्रपटावर बंदीची मागणी करणाऱ्यांवर टीका केली. चित्रपटांना मंजुरी देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असतो. सनातन धर्म इतका कमकुवत नाही की कुणीतरी भगवे कपडे वापरल्याने संकटात येईल आणि इस्लामही इतका कमकुवत नाही की एका चित्रपटाने धर्माच्या भावना दुखावतील. चित्रपटांवर बंदीची मागणी करण्याचा ट्रेंड आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT