Suchandra Dasgupta Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Suchandra Dasgupta Passes Away : बाईकसमोर अचानक सायकल ,मागुन ट्रक आला अन् जागीच... अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ताचा मृत्यू

बंगाली अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता हिचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Rahul sadolikar

मनोरंजन क्षेत्रातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुचंद्र दासगुप्ता यांचे भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून कुटुंबीय आणि इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. 

सुचंद्र दासगुप्ता (29) यांना दुचाकी अपघातात जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांचे औपचारिक निवेदनही समोर आले असून, त्यात हा अपघात कसा घडला हे सांगण्यात आले आहे. सध्या तपास काय सुरू आहे?

असा झाला अपघात...

सुचंद्र दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत होत्या. घरी येण्यासाठी तिने ड्रायव्हिंग अॅपवरून बाईक बुक केली होती, अचानक तिच्या बाईकसमोर एक सायकलस्वार आला, नंतर ड्रायव्हरने ब्रेक दाबला.

 मग अभिनेत्रीने उडी मारली आणि पडली, त्यानंतर तिथून जाणाऱ्या लॉरीने तिला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुचंद्र दासगुप्ता यांना जीव गमवावा लागला.

हेल्मेट होतं ;पण तरीही..

त्या वेळी अभिनेत्रीनेही हेल्मेट घातले होते, पण अचानक ब्रेक लागल्याने ती उडी मारून पडली आणि हेल्मेटही खाली पडले. तेव्हा मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. तिचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलिसांनी ट्रकचालकालाही अटक केली आहे. या अपघाताने सर्वांनाच हादरवले आहे.

उगवती तारका सुचंद्र दासगुप्ता....

सुचंद्र दासगुप्ता यांच्यासोबत घडलेल्या या वेदनादायक अपघाताची माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने अनेक शोमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती इंडस्ट्रीतील उगवती स्टार होती. तिने 'विस्वरूप बंदोपाध्याय' आणि मोहना मैती स्टारर 'गौरी एलो' सारख्या प्रोजेक्टमध्ये काम केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT