ballet dancer of the National Opera of Ukraine Artem Datsyshyn Dainik Gomantak
मनोरंजन

रशियन गोळीबारात युक्रेनियन बॅलेट डान्सरचा मृत्यू

Artem Datsyshyn युक्रेनच्या आघाडीच्या नर्तकांपैकी एक होता.

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर सतत गोळीबार करत आहे तसेच हवाई हल्ले करत आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो लोक जखमी झाले आहेत. तर 600 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, रशियन गोळीबारात जखमी झालेल्या युक्रेनमधील नॅशनल ऑपेराच्या बॅलेट डान्सरचाही मृत्यू झाला आहे. त्याचे नाव अरटायम दाशिशिन होते. तो 43 वर्षांचा होता. तीन आठवड्यांपूर्वी रशियन गोळीबारात तो जखमी झाला होता. आर्टेम डॅटशिन हे सेर्ही लिफर (1996) आणि रुडॉल्फ नुरिव्ह (1998) च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेते आहेत.

दशिशिन युक्रेनच्या आघाडीच्या नर्तकांपैकी एक होता. शुक्रवारी कीव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासोबतच प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्री ओक्साना शेवेट्स हिलाही रशियन गोळीबारात आपला जीव गमवावा लागला. ओक्साना ही एक प्रसिद्ध थिएटर कलाकार देखील होती. 24 फेब्रुवारी रोजी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले.

युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, युद्धात आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंनी युक्रेनच्या तटस्थ स्थितीबाबत करार झाला असल्याचे युक्रेनच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी करणार्‍या रशियन शिष्टमंडळाच्या प्रमुखाने सांगितले आहे.

दरम्यान युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धात रशियाने शुक्रवारी पहिल्यांदाच युक्रेनवर अत्याधुनिक किन्झेल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, 'रशियन लष्कराने या क्षेपणास्त्राचा वापर पश्चिम युक्रेनमधील (Ukraine) शस्त्रसाठा नष्ट करण्यासाठी केला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT