Bade Miyan Chote Miyan Dainik Gomantak
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan: चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांची दोन गटात विभागणी

Bade Miyan Chote Miyan: तर दुसरीकडे काही चाहत्यांच्या मते, हा उत्तम चित्रपट आहे.

दैनिक गोमन्तक

Bade Miyan Chote Miyan: सध्या बॉलीवूडचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये दाखल होत आहेत. २५ जानेवारीला हृतिक रोशनचा फायटर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा छोटे मियॉ बडे मियॉ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हजर होणार आहेत.

आता या चित्रपटावरुन ट्विटरवर दोन गट पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट कसा आहे, यावरुन हा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅक्शन पाहायला मिळत असून दोन्ही हिरो हम हृदय से सैनिक है पर दिमाग से शैतान है असे म्हणताना दिसत आहेत.

मात्र चित्रपटाचा सूर तसाच जूना वाटत आहे. ज्यामध्ये सैनिकांचा विजय आणि भारतीय सैनिकांची देशभक्ती दाखवण्यात आली आहे. आत्तापर्यंत असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून नवीन कथेची गरज होती असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे काही चाहत्यांच्या मते, हा उत्तम चित्रपट आहे.

या टीझरची सुरुवात अशा संवादाने होते, 'महाप्रलय येत आहे, जे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य बदलेल. एक प्रलय जो चांगल्या आणि वाईट यांच्यातील युद्ध कायमचा संपवेल. भारताचा नाश होईल. मला कोण रोखू शकेल?'

या टीझरमध्ये असेही सांगण्यात आले आहे की अक्षय आणि टायगरचा हा चित्रपट यावर्षी ईदला पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफरच्या या चित्रपटात अक्षय आणि टायगर व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ आणि रोनित रॉय देखील दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT