Bachchhan Pandey Poster Twitter
मनोरंजन

धूम धड़ाका रंग पटाखा म्हणत अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा ट्रेलर रिलीज

ट्रेलरमध्ये क्रिती सेनन एका फिल्ममेकरच्या भूमिकेत असून, तिला 'बच्चन पांडे' नावाच्या खतरनाक गुंडावर चित्रपट बनवायचा आहे.

दैनिक गोमन्तक

Bachchan Pandey Trailer Released: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चाहत्यांसाठी 'बच्चन पांडे'चा ट्रेलर रिलिज झाला आहे. बच्चन पांडे या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अक्कीचे चाहते खूप खूश आहेत. अक्षय कुमारशिवाय या चित्रपटात क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये क्रिती सेनन एका फिल्ममेकरच्या भूमिकेत असून, तिला 'बच्चन पांडे' नावाच्या खतरनाक गुंडावर चित्रपट बनवायचा आहे. यासाठी ती तिच्या मित्राची मदत घेते.

काय आहे बच्चन पांडेची कथा

चित्रपटाचा ट्रेलर क्रिती सेनन आणि अर्शद वारसीपासून सुरू होते, क्रिती सेननने तिच्या चित्रपटाची कल्पना तिचा मित्र अर्शद वारसीसोबत शेअर केली, तेव्हाच ती सांगते की ती बच्चन पांडेवर तिचा चित्रपट बनवणार आहे आणि शीर्षक देखील तयार आहे. बच्चन पांडेच चित्रपटाचे नाव असणार आहे. हे ऐकून अर्शदने क्रितीला असे करण्यास नकार दिला. मात्र क्रितीने त्याच न एकता आपल्या मित्राला घेवून ती बच्चन पांडेच्या अड्ड्यावर पोहोचतात. तिथेच क्रिती आणि अर्शद बच्चन पांडे आणि त्याच्या पंटर्सला भेटतात. यानंतर ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठीचीही एन्ट्री होते. जॅकलीन फर्नांडिसही तिथे येते. या चित्रपटात जॅकलिन बच्चन पांडेच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. आता कथेत ट्विस्ट येतो जेव्हा बच्चन पांडे त्याच्या मैत्रिणीलाच मारतो, त्याने हे का केले? बच्चन पांडेवर चित्रपट बनवायला आल्यावर क्रितीच्या जीवाला धोका होता का? हे जाणून घेण्यासाठी 'बच्चन पांडे' चित्रपटाची वाट पाहावी लागेल.

याआधी अक्षय कुमारच्या बच्चन पांडेचे अनेक पोस्टर्स समोर आले होते आणि सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर रिलीज केले. अक्षयच्या चित्रपटाचे पोस्टर समोर येताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता वाढली. चित्रपटाचा ट्रेलर पाहताच चित्रपट सुपरहिट असल्याचे चाहते म्हणत आहेत. त्यामुळे काही लोक याला आतापासून ब्लॉकबस्टर हिट चित्रपट म्हणत आहेत.

ट्रेलर समोर येताच, अनेक लोक कमेंट सेक्शनमध्ये चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याचा अंदाज लावत आहेत. अक्षयचा हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो, असा विश्वास चाहत्यांना आहे. अक्षयच्या एका चाहत्याने लिहिले - 'आमचा अक्की भैया आला', तर कोणी लिहिले - अक्षय कुमारची काय जबरदस्त एन्ट्री आहे, एका यूजरने लिहिले - बॉलिवूडचे गॉडफादर आले आहेत. तर कोणी अक्षयच्या चित्रपटाची तुलना आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाशी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Oscar 2027: 'श्वास', 'कोर्ट'नंतर आता 'गोंधळ'! 33 तगड्या चित्रपटांना पछाडत ऑस्करसाठी निवड; मिळाले तुफानी रेटिंग

Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

SCROLL FOR NEXT