Ram Mandir in Ayodhya  Dainik Gomantak
मनोरंजन

Ayodhya Ram Mandir: रामनगरीतून आणलेला प्रसाद दाखवत लक्ष्मण म्हणाला...

Ayodhya Ram Mandir: आता रामायणात लक्ष्मणाची भूमिका निभावलेल्या सुनिल लाहिरी यांनी आयोध्येतील प्रसादाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Ayodhya Ram Mandir: राममंदीर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारी २०२४ ला पडला आहे. मात्र आजही या सोहळ्याच्या चर्चा होताना दिसत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक नामांकित व्यक्ती सहभागी होताना दिसले होते. आता रामायणात लक्ष्मणाची भूमिका निभावलेल्या सुनिल लाहिरी यांनी आयोध्येतील प्रसादाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

रामानंद सागर यांच्या 'रामायण' या टीव्ही मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी यांनी 22 जानेवारी हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे वर्णन केले. जेव्हा अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलियासोबत अयोध्येला पोहोचले होते. ते अयोध्येहून परतले तेव्हापासून फक्त त्या जागेचीच चर्चा होताना दिसत आहे. आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितले आहे की राम मंदिर प्राणप्रतिष्ठेमध्ये मिळालेल्या प्रसादात काय होते.

सुनील लाहरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सर्वप्रथम सर्वांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठामध्ये काय प्रसाद मिळाला हे दाखवले. आधी त्यांनी स्टीलचा डबा दाखवला ज्यात बेसनाचे लाडू होते. त्यानंतर त्यामध्ये तुळशीमाळ, रुद्राक्ष, शबरी मनुका, कुमकुम, केशर, दिया, गंगाजल असल्याचे दाखवले. त्यांनी या व्हिडिओत हा प्रसाद जास्तीत जास्त लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. कारण अनेकांना या सोहळ्याला हजर राहायचे होते मात्र सगळ्यांनाच ते शक्य नव्हते. बाकीच्यांनीसुद्धा असेच करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यासोबतच त्यांनी राममंदीराविषयी आठवण सांगतिली आहे. ते म्हणतात- मी तीन दशकापूर्वी जेव्हा पहिल्यांदा अयोध्येला गेले होते तेव्हा त्यांनी मंडपात रामाची मूर्ती पाहिली आणि त्यांना खूप वाईट वाटले होते. मला वाटतं, काळाबरोबर न्याय योग्य दिशेने गेला आहे. दरम्यान, या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT