Avatar 2 Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar The Way of Water ने 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ला टाकले मागे, जेम्स कॅमेरॉनच्या चित्रपटाने भारतात रचला मोठा इतिहास

यासह 'अवतार 2' हा भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

Avatar The Way of Water Box Office: प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' जगभरात भरपुर कमाई करत आहे. आता या चित्रपटाने (Movie) भारतात एक नवा इतिहास रचला आहे. यासोबतच 'अवतार 2' ने कमाईच्या बाबतीत मार्व्हल स्टुडिओजच्या 'अव्हेंजर्स एंडगेम' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'अवतार 2' हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

'Avengers Endgame' चा रेकॉर्ड मोडला

'अवतार: द ऑफ वे वॉटर' या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 368 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर एव्हेंजर्स एंडगेमने भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office) 367 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे जेम्स कॅमेरॉनच्या चित्रपटाने (Movie) 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' चा विक्रम मोडला आहे.

'अवतार: द वे ऑफ वॉटर' ची कमाई

पहिला आठवडा - 182.90 कोटी
दुसरा आठवडा - 98.49 कोटी
तिसरा आठवडा - 54.53 कोटी
चौथा आठवडा - 21.53 कोटी

पाचवा आठवडा - 9.45 कोटी
सहावा आठवडा (शुक्रवार) - 1.30 कोटी
एकूण संकलन - 368.20 कोटी

'अवतार' ची गोष्ट अजून संपलेली नाही

'अवतार 2' 16 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. रिपोर्ट्सनुसार, जेम्स कॅमेरून या फ्रँचायझीचे उर्वरित तीन भाग एकामागोमाग एक रिलीज करतील आणि ही मालिका 2028 पर्यंत सुरू राहील. 'अवतार 3' (20 डिसेंबर 2024), शेवटचा भाग 'अवतार 4' 22 डिसेंबर 2028 रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.

'अवतार 2' 12 वर्षांनंतर रिलीज झाला

जेम्स कॅमेरूनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट 13 वर्षांनंतर रिलीज झाला आहे. त्याचा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता. त्याने जगभरात कमाईच्या बाबतीत इतिहास रचला. 'अवतार 2' मध्ये मागील कथा पुढे नेण्यात आली आहे. इंग्रजीशिवाय 'अवतार 2' भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT