Box Office Report Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Report: अवतार 2 आणि दृश्यमची बॉक्स ऑफिसवर रस्सीखेच.. कुठल्या चित्रपटाने किती कमावले?

Rahul sadolikar

जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित अवतार 2 ने रिलीज झाल्यापासुन बॉक्सऑफिसवर आपली मजबुत पकड बनवली आहे. भारतासह जगभरातुन या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण या सिनेमाला बॉलिवूडच्या सिंघमचा अर्थात अजय देवगनचा दृश्यमही जोरदार टक्कर देत आहे.

अवतार 2 ने आतापर्यंत 5000 कोटींचा कमाईचा टप्पा पार केला आहे.अवतारने भारतातही कोटींची उड्डाणं घेतली आहेत. भारतात 40 कोटींपासुन सुरू झालेला कमाईचा आकडा आता जवळपास 200 कोटींच्या पुढे गेला आहे. 16 डिसेंबरला रिलीज झालेल्या दिवसापासुन आतापर्यंत अवतार: द वे ऑफ वॉटर या सिनेमाने जबरदस्त कमाई केलीय.

'अवतार: द वे ऑफ वॉटर' (Avatar 2) ने भारतात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरूवात केली . जेम्स कॅमेरून (James Cameron) च्या या चित्रपटाने 16 डिसेंबरला इंडियन बॉक्स ऑफिस वर 40.50 कोटी रुपये कमवले. आणि आता सातव्या दिवशी या सिनेमाने 200 कोटी रुपयाचा आकडा गाठला . साहजिकच हा सिनेमा हिट होण्याच्या दिशेने वेगाने जात आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंहच्या 'सर्कस' (Cirkus) च्या रिलीज होण्याचा 'अवतार 2' वर काही परिणाम झाला नाही. या सिनेमाने शुक्रवारी 12.85 कोटी इतकी कमाई केली

पण या सगळ्यात अजय देवगनच्या दृश्यम 2 (Drishyam 2)ने मात्र जोरदार कमाई केली आहे. थिएटरमध्ये इतर चित्रपट रिलीज झालेले असतानाही दृश्यम 2 जादु काही कमी झाली नाही.

अवतार 2च्या रिलीजनंतर दृश्यमच्या कमाईचा वेग कमी झाला असला तरी ती अपेक्षितरीत्या सुरू आहे. वरुण धवनचा 'भेड़िया' आणि आयुष्मान खुरानाचा 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो' हे दोन चित्रपट रिलीज झाले. शुक्रवारी 'अवतार: द वे ऑफ वॉटर रिलीज झाली. पण या सगळ्याचा कसलाच परिणाम दृश्यमवर झाला नाही. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेला दृश्यम पूर्ण एक महिना थिएटरमध्ये टिकुन आहे.

दृश्यम 2 ची कमाई

पहिला आठवडा :104.66 कोटी

दूसरा आठवडा : 58.82 कोटी
तीसरा आठवडा: 32.82 कोटी
चौथा आठवडा: 19.4 कोटी
पाचवा आठवडा: 8.98 कोटी

एकुण कमाई: 265.12 कोटी

चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन: 321.12 कोटी

थोडक्यात दृश्यमने 'अवतार'ला कमाईच्या बाबतीत एकांगी टक्कर दिलीय असंच म्हणावं लागेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT