Urfi Javed : बापरे ! हॉकी प्लेअर युवराजने घेतला थेट उर्फी जावेदशी पंगा..सोशल मिडियावर राडा

हॉकी प्लेअर युवराज वाल्मिकीने सोशल मिडियावर थेट उर्फी जावेदशी पंगा घेतला आहे.
Urfi  Javed | Hockey player Yuvraj | Urfi  Javed Controversy
Urfi Javed | Hockey player Yuvraj | Urfi Javed ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

Urfi Javed on Yuvraj: उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही . 'बिग बॉस - ओटीटी'मधुन फेमस झालेली उर्फी आपल्या अतरंगी कपड्यांंमुळे तर फेमस असतेच पण त्याचबरोबर ती आता सतत होणाऱ्या भांडणामुळे चर्चेत असते.

यावेळी तिच्याशी पंगा घेतला आहे हॉकी प्लेयर युवराज वाल्मिकी याने. युवराजने उर्फी जावेदच्या एका व्हिडीओवर केलेल्या कमेंटमुळे उर्फी चांगलीच पेटुन उठली आहे. इतकंच नाही तर उर्फीने काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण चला जाणुन घेऊया.

उर्फी जावेद हे नाव समोर आलं सगळ्यात आधी आठवतात तिचे अतरंगी कपडे. या कपड्यांच्या कारणावरुन आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. उर्फी जावेद आणि हॉकी प्लेअर यांच्यातला हा वाद चांगलाच पेटलेला दिसतोय.

कारण उर्फीने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असुन त्यात तिने युवराजने तिला कसा त्रास दिला याबद्दल सांगितलं आहे. यात उर्फी इमोशनल झालेली दिसते.

या वादाची सुरुवात विरल भयानी याने इंन्स्टावर टाकलेल्या एका व्हिडीओपासुन झाली आहे. या एडिटेड व्हिडिओमध्ये उर्फी एका कारागृहात तोकड्या कपड्यांसह दिसते. या व्हिडिओत उर्फी असं म्हणताना दिसते "जसं पुर्ण देशाला बघायचं होतं अगदी तसं झालं".

या व्हिडिओवर हॉकी प्लेयर युवराज वाल्मिकीने केलेल्या कमेंटपासुन हा वाद सुरू झाला. या व्हिडीओला उर्फीच्या दुबईत झालेल्या अटकेचे संदर्भ आहेत.

यावर युवराजने कमेंट केली होती, "थॅंक यु दुबई, प्लिज हिला नेहमी तिकडेच ठेवा. मी तुमचा आभारी असेन" यावर उर्फीने युवराजला टॅग करत कमेंट केली होती. तुला माझे कपडे आवडत नाहीत तरी मला मॅसेज करत असतोस.

त्यानंतर लगेच एक दुसरी कमेंट करत तिने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे, ज्यात उर्फी लिहतेय कि मी हा मॅसेज शेअर करत आहे जा तु मला आणि 99999 मुलींना पाठवलेला आहेस. यानंतर उर्फीने इंन्स्टाग्रामवर ते सगळे स्क्रिनशॉट शेअर केले ज्यात युवराज उर्फीला हाय- हॅलो करतोय. यात ती असंही विचारताना दिसते कि,मी तुझं काय बिघडवलं ज्यामुळे तु मला जेलमध्ये टाकायला निघाला आहेस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com