TMKOC Dainik Gomantak
मनोरंजन

TMKOC: 'दयाबेन पुन्हा मालिकेत...'असित मोदींनी केली स्पष्ट केली भुमिका

TMKOC: आता हा शो ऑफ एअर होणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता असित मोदींनी यावर मौन तोडलं आहे.

दैनिक गोमन्तक

TMKOC: गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा शो चांगलाच चर्चेत आहे. तारक मेहता मधील प्रसिद्ध दयाबेनच्या पात्रावरुन वाद रंगताना दिसत आहे.

हे पात्र गेल्या काही वर्षांपासून मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांनी अनेकवेळा दयाबेनला मालिकेत परत आणण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप मालिकेत दयाबेनचे पात्र साकारणारी दिशा वाकानी किंवा त्याजागी इतर कोणतीही अभिनेत्री दिसली नाही. त्यामुळे आता हा शो बंद करावा अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे. बॉयकॉट TMKOC असा ट्रेंड सोशल मिडियावर चालताना दिसत आहे.

एक नियमित प्रोमो देखील प्रसारित केला, ज्यामध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दाखवण्यात आले. गोष्टी अशा पद्धतीने दाखवल्या गेल्या की आता दयाबेन आल्याचं सगळ्यांना वाटलं. पण तसे झाले नाही, त्यानंतर चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी 'तारक मेहता...'वर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली. आता हा शो ऑफ एअर होणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता असित मोदींनी यावर मौन तोडलं आहे.

'मी माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येथे आलो आहे आणि मी माझ्या प्रेक्षकांशी कधीही खोटे बोलणार नाही. केवळ काही परिस्थितींमुळे आपण दयाचे पात्र वेळेत परत आणू शकत नाही. पण, याचा अर्थ असा नाही की हे पात्र शोमध्ये येणार नाही. दयाबेनचे पात्र साकारण्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. कारण दिशा वाकानीने ज्याप्रकारे दयाबेनचे पात्र साकारले आहे, त्या तोडीचे पात्र साकारणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी अवघड असल्याचे असित मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये दयाबेनचे पात्र साकारणाऱ्या दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. तेव्हापासून प्रेक्षक दयाबेनच्या पात्राची वाट बघत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मालिकेतील अनेक कलाकारांनी ब्रेक घेतल्याने अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. आता मालिकेत पुन्हा दयाबेनचे पात्र दिसणार कि शो बंद होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT