Arjun Kapoor - Malaika Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika - Arjun : मलाईका - अर्जुनचं व्यवस्थित सुरुय..ब्रेक-अप वगैरे काही नाही, उगाचच अफवा...

या दोघांनी एकमेकांच्या नातेवाईकांना अनफॉलो केल्याने दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे, अशी चर्चा सुरु झाली. पण आता या सर्व अफवा असल्याचं समजतंय.

Rahul sadolikar

सध्या सोशल मिडीयावर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु होत्या. या दोघांनी एकमेकांच्या नातेवाईकांना अनफॉलो केल्याने दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये खरंच काहीतरी तथ्य आहे, अशी चर्चा सुरु झाली. पण आता या सर्व अफवा असल्याचं समजतंय.

आता हे दोघे सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाल्याने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते अजूनही एकत्र आहेत आणि सर्व काही ठीक आहे. रविवारी अर्जुन आणि मलायका एकत्र स्पॉट झाले होते.

रविवारी मुंबईत पाऊस पडत असताना मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जेवणासाठी बाहेर गेले होते. दोघांनी एकत्र जेवण केले आणि जेव्हा दोघे बाहेर आले तेव्हा पापाराझींनी त्यांना स्पॉट केले. यादरम्यान दोघेही काही न बोलता थेट त्यांच्या गाडीत बसले.

दोघांनाही असे एकत्र पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले की देवाचे आभार मानतात की दोघे एकत्र आहेत आणि त्यांचे ब्रेकअप झाले नाही. त्याचवेळी एका यूजरने मलायका अरोराच्या व्हाइट कलरच्या आउटफिटचे कौतुक केले.

तुम्हाला माहिती आहे की, एक दिवसापूर्वी अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या पोस्टवर कमेंट करून दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे, मलायकाने अर्जुनच्या बहिणी खुशी, जान्हवी आणि अंशुला कपूर यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे सांगण्यात आले.

आतापर्यंत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या दोघांच्या ब्रेकअपचे कारण ठरले कुशा कपिला.

खरं तर, अर्जुनसोबत कुशाचा एक फोटो समोर आला होता, ज्यानंतर लोक म्हणू लागले की दोघेही डेट करत आहेत आणि अभिनेत्याने मलायकासोबत ब्रेकअप केले आहे. मात्र कुशाने अशा अफवांवर नाराजी व्यक्त करत यात काहीही तथ्य नाही असं म्हटलंय.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT