Actress Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

आता अनुष्काही उतरणार क्रिकेटच्या मैदानात

अशा परिस्थितीत विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासमवेत भारतीय खेळाडूंना दिलेल्या या ब्रेकमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या इंग्लंड (England) दौर्‍यावर आहे. 4 ऑगस्टपासून टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासमवेत भारतीय खेळाडूंना दिलेल्या या ब्रेकमध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे.अनुष्का शर्मा आता बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवत आहे. तिला अखेर शाहरुख खान सोबत 'झिरो' (zero) या चित्रपटात पाहिले होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.(Anushka Sharma to play lead role in Jhulan Goswami biopic)

Jhulan Goswami and Anushka Sharma

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का दिसणार मुख्य भूमिकेत

'चकदाहा एक्सप्रेस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. गेल्या वर्षी 2020 च्या सुरुवातीच्या काळात झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा दिसणार असल्याची बातमी आली होती. ईडन गार्डन्समध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनुष्का शर्माची फोटोज प्रचंड व्हायरल झाली होती, त्यामध्ये ती निळ्या जर्सीमध्ये दिसली होती.

मात्र, नंतर या चित्रपटाविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पण आता चाहत्यांसाठी चांगली बातमी आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही वेळात सुरू होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ही बातमी समजताच अनुष्का शर्माचा निळा जर्सीचा फोटो पुन्हा व्हायरल होत आहे.

Jhulan Goswami and Anushka Sharma

चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होईल ?

बॉलिवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या वेबसाईटने झूलनच्या बायोपिकची स्क्रिप्ट अद्याप कार्यरत असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाचे शूटिंग 2021 च्या शेवट होण्यापूर्वी सुरू होऊ शकत नाही.याशिवाय सूत्रांनी सांगितले की, 'अनुष्का सध्या तिच्या मदर हुडचा आनंद घेत आहे. ती आणि वामिकादेखील विराट कोहलीसह त्याच्या क्रिकेट स्पर्धेच्या दौर्‍यावर आहेत. तर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकत नाही.

Jhulan Goswami and Anushka Sharma

झुलन गोस्वामी ही जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे

महिला क्रिकेटच्या (Women Cricket) महान गोलंदाज झूलन गोस्वामीने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 वर्षे पूर्ण केलेल्या झुलनने महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त विकेट मिळविणारी जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. झुलनने आपल्या कारकीर्दीत 333 आंतरराष्ट्रीय विकेट घेतले आहेत.

झुलन गोस्वामीने वनडे क्रिकेटमध्ये 200 हून अधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज आहे. तिने 180 वनडे सामन्यात 236 विकेट घेतले आहेत. झूलनने कसोटी क्रिकेटमध्ये 11 सामन्यांत 41 तर 68 टी -20 सामन्यांत 56 बळी मिळवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT