Anurag Dobhal- Khanzadi
Anurag Dobhal- Khanzadi Dainik Gomantak
मनोरंजन

अनुराग अन् खानजादीचा Video Viral नेटकरी म्हणाले- 'हे तर...'

दैनिक गोमन्तक

Video Viral: बिग बॉसचा १७ वा सीझन संपला असला तरी या पर्वातील स्पर्धकांची अजूनही चर्चा रंगताना दिसते. मग तो हा सीझनची ट्रॉफी जिंकलेला मुनव्वर असू दे, लोकांची मने जिंकणारा अभिषेक असू दे, मन्नारा चोप्रा किंवा आपल्या पती-पत्नीच्या नात्यामुळे चर्चेत असलेले अंकिता आणि विक्की असू दे या स्पर्धकांबरोबर इतर स्पर्धकदेखील मोठ्या चर्चेत असतात.

आता खानजादी आणि अनुराग डोबालचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दोघेही 'बिग बॉस' नंतर पहिल्यांदाच एकमेकांना भेटले आणि या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. सोशल मीडियावर दिसत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना पाहून अत्यंत खूष असल्याचे पाहायला मिळत आहे. एकमेकांना मिठी मारुन ते आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरही त्यांचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सोशल मिडियावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एक युजर म्हणाला की, हे दोघे शो मध्ये कधी मित्र होते? दुसरा एक युजर म्हणतो की, नुसता दिखावा आहे, सगळे खोटे आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या शो मध्ये या दोघांनीदेखील बिग बॉसविरुद्ध अनेकदा बंड पुकारले होते. हे दोघेही शोच्या ग्रँड फिनालेला पोहचले नाहीत. त्यावरुनही मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अनुरागने 'जे लोक बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेला मी का आलो नाही हे विचारत आहेत,तर त्याचे उत्तर आहे की त्यांच्या स्वाभिमानासाठी मी त्यांची खोटी प्रशंसा करू शकत नाही.' असे म्हटले होते. आता त्यांची मैत्री किती काळ टिकणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT