The Kashmir Files
The Kashmir Files  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files :"द कश्मिर फाईल्स" ऑस्करच्या शर्यतीतून पडला कारण....अनुपम खेरनी सांगितलं कारण

Rahul sadolikar

यावर्षी ऑस्करच्या नामांकन यादीत जिथे एस.एस. राजामौलीचा तेलगू चित्रपट RRR ने धुमाकूळ घातला आहे तर विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांची महत्वाची भूमीका होती. आता अनुपम खेर यांनी हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला? हे सांगितलं आहे

यंदा ऑस्कर पुरस्काराबाबत भारतीय चाहत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. खरं तर, 95 व्या वार्षिक अकादमी पुरस्कारांमध्ये, एस.एस. राजामौली यांचा तेलगू चित्रपट आरआरआरनेही या यादीत स्थान मिळवले आहे. या साऊथ चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीतील नामांकनात आपले स्थान मजबूत केले आहे. 

एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे लोक प्रचंड चाहते आहेत आणि अनुपम खेर यांनाही हे गाणे खूप आवडते. त्यांच्या नवीन मुलाखतीत अनुपम खेर यांनी RRR आणि त्यातील 'नाटू नाटू' या गाण्याचे कौतुक केले.

त्यांनी पुढे बोलताना विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' बद्दलही सांगितलेही सांगितलं की का हा चित्रपट 2023 मध्ये ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर आहे. ऑस्करच्या शर्यतीत जगभरातील 301 चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता

पुरस्काराच्या शर्यतीत भारतातील आणखी बरेच चित्रपट होते. RRR व्यतिरिक्त 'चेल्लो शो', 'कंतारा' आणि 'गंगुबाई काठियावाडी' सारखे चित्रपटही यावर्षी ऑस्कर पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत होते. या यादीत अनुपम खेर यांचा अभिनय असलेला द काश्मीर फाइल्सचाही समावेश होता. 

काश्मीर फाइल्स' ऑस्करमधून बाहेर पडल्याबद्दल ते म्हणाले - 'द काश्मीर फाइल्स'मध्ये नक्कीच काही अडचण आली असेल. ते म्हणाला, 'मी पहिला माणूस आहे ज्याने असे ट्विट केले आहे कारण मला खरोखर वाटते की नाटु नाटु अप्रतिम आहे, संपूर्ण गर्दी या गाण्यावर नाचते.'

ते म्हणाले, 'आतापर्यंत जे जे चित्रपट पाश्चिमात्य प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आले आहेत ते भारतीयांच्या गरिबीवर बनले आहेत, काही परदेशी लोकांनीही यावर चित्रपट बनवले आहेत मग ते रिचर्ड अॅटनबरो असोत की डॅनी बॉयल. हिंदुस्थानी चित्रपट किंवा तेलगू चित्रपट किंवा जे काही...

मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.' या चित्रपटाकडुन अनुपम खेर यांना खरंच मोठ्या अपेक्षा होत्या. पण ऐनवेळी चित्रपट स्पर्धेतून बाहेर पडल्याने ते नाराज होणं साहजिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

Agonda News : मुडकूड-आगोंदच्या समस्या सुटणार; सभापती तवडकर यांची ग्वाही

Summer Camp : रवींद्र भवन मडगाव आयोजित उन्हाळी शिबिराला प्रतिसाद

ISRO Successfully Tests 3D-Printed Rocket Engine: इस्रोने रचला इतिहास, 3D प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी

SCROLL FOR NEXT