Ankita Lokhande-Vicky Jain Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande-Vicky Jain: बिग बॉसने असा खेळला खेळ; विकी अन् अंकितामध्ये निर्माण झाला दुरावा

Ankita Lokhande-Vicky Jain: विकी जैन तिला समजवत राहतो, पण अंकिता ऐकत नाही.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande-Vicky Jain: बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये जोरदार भांडणे आणि गोंधळ सुरु असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे टीव्ही कलाकारांच्या जोडप्यांमध्येच ही भांडणे सुरु आहेत.

आता नवीन प्रोमो रिलिज झाला असून यामध्ये अंकिता लोखंडे तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच विकि जैन बरोबर भांडताना दिसत आहे.

प्रदर्शित झालेल्या बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये बिग बॉस रहिवाशांना सांगत आहेत, 'कथेचा नवा ट्विस्ट तुमच्यासमोर आहे.'

बिग बॉसने घरातील सदस्यांना एक संदेश पाठवला आहे. यामध्ये विकी जैन म्हणताना दिसत आहे, विकी भैय्याला दिमाग के मकान मध्ये पाठवले नसते तर दुसरे काय केले असते.

विकी आणि अंकितामध्ये भांडण

यानंतर बिग बॉस अंकिताला विचारतात की तुझा चेहरा इतका निराश का आहे? ज्याच्यासाठी तुला वाईट वाटत आहे, तो तिथे नाचत आहे. खूप आनंदात आहे. जेव्हा विकी जैन अंकिताला समजवायला जातो तेव्हा ती चिडते आणि म्हणते, तू खरोखर स्वार्थी आणि मूर्ख आहेस. तुझ्यासोबत राहून माझं नशीब खरंच खराब झालं.

आपण विवाहित आहोत हे विसरून जा. आजपासून तू वेगळा, मी वेगळा. तू बरोबर होतास. तू माझा वापर केला आहे. विकी जैन तिला समजवत राहतो, पण अंकिता ऐकत नाही.

दरम्यान, दुसरीकडे, 'बाबू भैय्या' अनुराग अरुणशी यांच्यात भांडण होताना दिसत आहे. परिस्थिती हाणामारीपर्यंत वाढते. या 'वीकेंड का वार'वर सलमानने विकी जैन आणि ऐश्वर्या शर्माला सूचना दिल्या होत्या.

येत्या आठवड्यात सलमान अंकिता आणि विकीला काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता येणारा एपिसोड कोणत्या नात्यांची समीकरणे बदलवणार, कोणती नाती दूर जाणार, कोणती जवळ येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT