Anil Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Anil Kapoor Viral Video : हे काय नवीनच? अनिल कपूर तोंडाला ऑक्सिजन मास्क लावुन पळतायत...व्हिडीओ व्हायरल

अनिल कपूरच्या तारुण्याचं रहस्य समजुन घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ बघाच

Rahul sadolikar

अभिनेता अनिल कपूर म्हणजे तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनिल कपूर बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्यांचे व्यक्तिमत्त्व भल्या भल्या यंग अॅक्टर्सना कांटे की टक्कर देतं. सोशल मीडियावर देखील ते खूप सक्रिय पहायला मिळतात.

त्यांनी नुकताच सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यामध्ये ते ऑक्सिजन मास्क लावून दिसत आहेत. बरं खरी बातमी त्यापुढे आहे...हा ऑक्सिजन मास्क लावून ते ट्रेड मिलवर चक्क पळताना दिसत आहेत.

अनिल कपूर यांनी आपले हे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे-''फाइटर मोड ऑन...''

यादरम्यान अनिल कपूर यांनी काळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला आहे. तसंच,त्यांनी ऑक्सिजन मास्कही लावला आहे.

अनिल कपूर यांच्या या फोटोज आणि व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोबत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री फातिमा सना शेखनं कमेंट करत लिहिलं आहे,'फायटर..', तर बिपाशा बासूनं लिहिलं आहे- 'मस्त... ',मनीष पॉलनं कमेंट करत लिहिलं आहे,'मॅन ऑन मिशन'. तर याव्यतिरिक्त रोहित शराफनं लिहिलं आहे,'यू आर अनबिलिवेबल..'.

अनिल कपूर यांच्या एका चाहत्यानं प्रशंसा करत लिहिलं आहे की,'एव्हरग्रीन', तर दुसऱ्यानं लिहिलं आहे,'यांचे वय कधी वाढणार?'

पण काही नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल देखील केलं आहे. तर काहीजण ऑक्सिजन मास्क लावून का पळताय असा प्रश्न देखील करत आहेत. एकानं लिहिलं आहे,'जर मास्क लावून पळावं लागतंय तर एवढी हौस तरी काय?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT