Anil Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Anil Kapoor and Rishabh Shetty: अभिनेता अनिल कपूर यांची कांताराच्या दिग्दर्शकाला विनंती म्हणाले, मित्रा ऋषभ..

अभिनेते अनिल कपूर यांनी एका राऊंड टेबल डिस्कशनमध्ये कांताराचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीला एक विनंती केली आहे.

Rahul sadolikar

अभिनेता अनिल कपूर बॉलीवूडचे मिस्टर फिटनेस आहेत. आजही त्यांचा फिटनेस अनेक तरुण कलाकारांसाठी आदर्श आहेत. याच वर्षी त्यांचा जुग जुग जियो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाचं चांगलं स्वागत केलं होतं.

'नेटफ्लिक्स' वर रिलीज झालेल्या थार या चित्रपटातल्या भूमीकेचंही प्रेक्षकांनी अनिल कपूर यांचं कौतुक केलं आहे. एक फिट अभिनेता म्हणुन अनिल कपूर केवळ बॉलीवूडसाठीच प्रेरणा नाहीत तर कित्येक फॅन्ससाठीही ते प्रेरणा ठरलेत.

 अनिल कपूर यांनी ‘पिंकव्हीला’ने आयोजित केलेल्या एका राऊंडटेबल डिस्कशनमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी आपल्या बॉलिवूडमधल्या प्रवासावरही चर्चा केली. अभिनेता अनिल कपूर यांनी काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या आणि प्रचंड यशस्वी ठरलेल्या कांतारा चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

अनिल कपूर यांनी कांताराचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याचं कौतुक केलंच पण एक विनंतीही केली ते म्हणाले "मित्रा ऋषभ पुढचा चित्रपट तु नक्की मला घेऊन कर". अनिल कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराकडुन कौतुक झाल्याने नक्कीच ऋषभ शेट्टी खुश झाला असेल.

आपल्याला माहितच आहे कि, अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटातचं प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं आहे. एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणुन ऋषभ शेट्टीने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT