Aditya Roy kapoor Ananya Panday Relationship Latest News  Dainik Gomantak
मनोरंजन

Ananya-Aditya Roy Kapur Relationship: आदित्य अन् अनन्या पून्हा एकत्र; व्हिडिओ झाला व्हायरल

Ananya-Aditya Roy Kapur: सध्या माझे लग्नाचे वय नसल्याचे अनन्या पांडेने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Ananya-Aditya Roy Kapur: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या अनेकदा एकत्र वेळ घालवत असल्याचे दिसून येत असल्याने ते एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चांनी जोर धरला आहे. आता या चर्चांना वेग येण्याची आणखी घटना घडली आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे त्यांच्या स्पेन आणि पोर्तुगाल सुट्टीवरून परतले असून विमानतळावर ते पून्हा एकदा एकत्र दिसून आले आहेत. मात्र, त्यांनी मुंबई विमानतळावरून एकट्याने बाहेर पडणे पसंत केले. ते दोघेही ग्रे कॅज्युअलमध्ये दिसून येत होते.

इंस्टाग्रामवर एका पापाराझीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात अनन्या आणि आदित्य विमानतळावरून बाहेर पडताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये अनन्या पांडे ग्राफिक ग्रे टी-शर्ट मध्ये तर आदित्य राखाडी टी-शर्ट आणि काळ्या ट्रॅक पॅंटमध्ये दिसून येत आहे.

स्पेन आणि पोर्तुगालमधील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून दोघांनी एकत्र क्वालिटी टाइम घालवल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनन्या आणि आदित्यने सोशल मिडियावर शेअर केलेल्या एक पोस्टमुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधान आले होते. स्पेनमध्ये आर्क्टिक मंकीचा एक कॉन्सर्ट एंन्जॉय करताना अनन्याने पोस्ट शेअर केली होती.

दुसरीकडे आदित्य रॉय कपूरनेदेखील त्याच कॉनर्स्ट मधील पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली होती. त्या दोघांनी केलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी दोन पोस्टमधील संबंध जोडत दोघेही एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे.

2022 मध्ये क्रिती सेनॉन च्या दिवाळी पार्टीनंतर या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांनी एकत्र कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली तर त्यांच्या रिलेशनशीपबद्दल अफवा पसरल्या आहेत.

दरम्यान, अनन्या पांडेने सध्या माझे लग्नाचे वय नसून माझे त्याबद्दल काही प्लॅन्सदेखील नाहीत असे एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले होते. चाहत्यांनी मात्र दोघांना एकत्र बघून आपले आवडते कपल असल्याचे म्हटले आहे.

आदित्य आणि अनन्या दिसणार 'या' प्रोजेक्ट्समध्ये

आदित्य अलीकडेच त्याची डेब्यू वेब सीरिज द नाईट मॅनेजर आणि गुमराह या चित्रपटात दिसला होता. आता तो अनुराग बासूचा दिग्दर्शित मेट्र इन दिनो या त्याच्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. तर अनन्या 'ड्रीम गर्ल 2', 'खो गये हम कहाँ', 'कंट्रोल' आणि 'कॉल मी बेब' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT