Amitabh Bachchan  Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: वर्ल्डकपच्या फायनलचा सामना पाहण्याबाबत बीग बी संभ्रमात

Amitabh Bachchan: या विजयानंतर बॉलिवूडचे आयकॉन अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ट्विट केले होते की, भारतीय संघ जिंकला कारण मी तो सामना पाहिला नाही.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: वर्ल्डकप आता फायनल स्टेजमध्ये पोहोचला असून भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेला सेमीफायनलचा सामना रोमांचकारी झाला असून या सामन्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

देशाला पाठिंबा दर्शवत, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, रजनीकांत आणि माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन हे हा सामना पाहण्यासाठी हजर नव्हते मात्र त्यांचे ट्वीट आता चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी एक्सवर ट्वीट करत, 'विचार करत आहे जाऊ कि नको जाऊ' म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने चांगली कामगिरी करत क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या विजयानंतर बॉलिवूडचे आयकॉन अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ट्विट केले होते की, भारतीय संघ जिंकला कारण मी तो सामना पाहिला नाही. ट्विटमध्ये बीग बींनी लिहिलं होतं, 'जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा भारत जिंकतो!'

आता १९ सप्टेंबरला होणाऱ्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याबाबत ते संभ्रमात असल्याचे त्यांच्या ट्वीटवरुन अंदाज लावला जात आहेत. त्यावरुन त्यांना अनेकांनी फायनलचा सामना न पाहण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने तर सर हा सामना राहू द्या त्यानंतरची मॅच बघायला जा असे म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांचे मागील ट्विट पाहता भारतीय क्रिकेट चाहत्यांनी बिग बी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांना सांगितले होते की, त्यांनी सामना पाहायला न गेले तर बरे होईल. दरम्यान, अमिताभच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते प्रभास आणि दीपिकासोबत 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहेत. आता अमिताभ बच्चन हा सामना पाहायला जाणार का? याबरोबरच, भारत ट्रॉफी घरी आणणार का याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT