Amitabh Bachchan| Social Media Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: बिग बींनी ट्विटरवर केली 'मोठी चूक' अन्...

अमिताभ बच्चन यांचे ट्विट चाहत्यांच्या नजरेस पडताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. बिग बी इंस्टाग्राम किंवा ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची संधी सोडत नाहीत. यावेळी अमिताभ बच्चन ट्विट करत होते, मात्र यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. आपली चूक लक्षात आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफीही मागितली, त्यानंतर काही लोक त्यांना मजेशीर उत्तर देत आहेत, तर काहींनी अभिनेत्याला ट्रोल केले आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमिताभ बच्चन त्यांच्या दमदार अभिनयासोबतच फनी स्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांची सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोअर्स आहे. यामुळेच अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा एखादी पोस्ट शेअर करतात तेव्हा ती खूप व्हायरल होते. पुन्हा एकदा त्यांचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट चाहत्यांच्या नजरेस पडताच सोशल मीडियावर (Social Media) कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या या ट्विटवर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले की, 'सर स्पष्टीकरणासाठी धन्यवाद. ऑर्डर चुकीची असल्याने आणि त्यामुळे माझा ताळेबंद जुळत नसल्याने मी खूप नाराज झालो होतो, तर दुसऱ्याने लिहिले, 'अरे चांगले तुम्ही मला सांगितले होते सर, नाहीतर मला याचा विचार करून झोप येत नव्हती. दुसऱ्याने लिहिले, 'उद्या बाजार कोसळेल आता!' तर, ट्विटमध्ये 'APOLGIES !' या चुकीच्या स्पेलिंगमुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन लवकरच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटात साऊथचे सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT