Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: कोर्टरुम थ्रिलर चित्रपट 'सेक्शन 84' चा टीझर बीग बीं नी केला शेअर

Section 84 Movie: अमिताभ बच्चन चित्रपट निर्माते रिभू दासगुप्ता यांच्या आगामी कोर्टरुम ड्रामा थ्रिलर चित्रपट 'सेक्शन 84' मध्ये काम करत आहेत.

Manish Jadhav

Amitabh Bachchan: बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही सिनेमॅटोग्राफीमध्ये सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, सातत्याने ते नवीन चित्रपट साइन करत आहेत. आज अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अमिताभ बच्चन चित्रपट निर्माते रिभू दासगुप्ता यांच्या आगामी कोर्टरुम ड्रामा थ्रिलर चित्रपट 'सेक्शन 84' मध्ये काम करत आहेत.

दरम्यान, 'सेक्शन 84'मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनीच केले आहे. टीझर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, 'या नवीन कंपनीसाठी प्रख्यात सर्जनशील विचारांची साथ मिळाल्याने पुन्हा एकदा आनंद होत आहे आणि हे आव्हान मला प्रेरित करते.'

तसेच, 'सेक्शन 84' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केल्याबद्दल दिग्दर्शक रिभू दासगुप्ता म्हणाले की, 'सरांसोबत पुन्हा काम करताना मला आनंद होत आहे.'

रिलायन्स एंटरटेनमेंटचे निर्माते विवेक बी. अग्रवाल म्हणाले की, "आमच्या पुढच्या चित्रपटात (Movie) मिस्टर बच्चन असणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. सेक्शन 84 मध्ये त्यांच्या आणि रिभूसोबत या साहसाची सुरुवात करताना मला आनंद होत आहे."

अमिताभ बच्चन आगामी प्रोजेक्ट्स

समीर चोप्रा, व्हीपी मार्केटिंग, रिलायन्स एंटरटेनमेंट म्हणाले की, “आम्हाला सेक्शन 84 वर काम सुरु करताना खूप आनंद होत आहे. रिभूचे अप्रतिम कथानक आणि श्री. बच्चन यांच्या पिअरलेस सुपरस्टारडममुळे 'सेक्शन 84' जगभरातील प्रेक्षकांसाठी एक अविश्वसनीय क्षण ठरेल.'

त्याचबरोबर, 'सेक्शन 84' रिलायन्स एंटरटेनमेंटने जिओ स्टुडिओच्या सहकार्याने प्रस्तुत केले आहे आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, फिल्म हँगर आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आहे.

शिवाय, मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते शेवटचे 'उंचाई' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. येत्या काळात बिग बी 'प्रोजेक्ट के'मध्ये दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT