Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: अन् बीग बींनी पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन!

Amitabh Bachchan: बीग बींना पाहिल्यानंतर आनंदात असलेल्या चाहत्यांची झलक व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन हे पिढ्यांपिढ्याचे आवडते अभिनेते आहे. त्यांच्या चित्रपटांवर, त्याच्या अभिनयावर, व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या आवाजावर प्रेम करणारे लाखो-करोडो चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी दर रविवारी त्यांच्या घराबाहेर प्रचंड गर्दी असते.

11 फेब्रुवारी रोजी, चाहत्यांशी त्यांची रविवारची भेट कायम ठेवत, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जलसा बंगल्यातून बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतली. पापाराझींनी शेअर केल्या व्हिडिओमध्ये, बीग बी त्याच्या बंगल्याबाहेर उभे असताना, त्याच्या चाहत्यांचे हात हलवत स्वागत केले आहे. जलसाच्या बाहेर बीग बींना पाहिल्यानंतर आनंदात असलेल्या चाहत्यांची झलक व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हात जोडून आणि हात उंचावून चाहत्यांचे स्वागत केले. जेव्हा त्यांचे चाहते फोटो काढत होते तेव्हा त्यांनी हात जोडत कृतज्ञता दाखवली. यावेळी त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनही या हृदयस्पर्शी क्षणाचा साक्षीदार होता. तो बाल्कनीत उभा असल्याचे दिसले.

अमिताभ बच्चन शेवटचे टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या 'गणपथ' या ॲक्शन चित्रपटात दिसले होते. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. याशिवाय बिग बींकडे दीपिका पदुकोण, प्रभास, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्यासोबत 'कल्की 2898 ए'सह अनेक चित्रपट आहेत. त्याच्याकडे रिभू दासगुप्ता यांचा 'सेक्शन 84'ही आहे.

तमिळ चित्रपट 'वेट्टैयान'साठी ते मेगास्टार रजनीकांतसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. गुरुजींच्या भूमिकेत अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'चा सिक्वेलही त्याच्याकडे आहे. आता हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

Savoi Verem: झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर; मांडवीच्या कडेवर वसलेला गाव 'सावईवेरे'

Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

SCROLL FOR NEXT