Amir - Shahrukh  Dainiik Gomantak
मनोरंजन

Amir-Shahrukh: "याला म्हणतात स्टारचं घर" जेव्हा शाहरुखच्या मन्नतचं वॉर्डरोब बघुन आमिर थक्क झाला होता...

Amir Khan on Shahrukh Khan's Mannat: अभिनेता शाहरुख खानच्या मन्नतविषयी जितकी कौतुक चाहत्यांना आहे तितकंच बॉलीवूडच्या स्टार्सनाही आहे.

Rahul sadolikar

Amir Khan on Shahrukh Khan's Mannat: अभिनेता शाहरुख खानचा जूहू येथील मन्नत बंगला एका राजवाड्यासारखाच आहे. कित्येक बॉलीवूड स्टार्सचे आलिशान बंगले मुंबईत आहेत ;पण चाहत्यांसाठी कौतुक आहे ते फक्त मन्नतचं.

कित्येकदा सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या मन्नतबद्दल बोलताना भावुक होतो एकदा तर म्हणाला होता की माझ्याकडे पुढच्या पिढीला देण्यासाठी मन्नत आहे. या मन्नतमध्ये माझा मुलगा बहिणी आणि माझं कुटूंब आहे.

शाहरुख खानच्या मन्नतचं कौतुक आमिर खानलाही आहे. एकदा आमिरने याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंही होतं. चला पाहुया आमिर खान मन्नतबाबत काय म्हणाला होता...

बॉलीवूडचे तीन खान

शाहरुख खान- आमिर खान आणि सलमान खान...या स्टार्सनी 3 दशकांत मिळवलेलं स्टारडम अक्षरश: थक्क करणारं आहे. या तीन खान त्रयींनी बॉलीवूडमधलं आपलं स्थान आजही अबाधित ठेवलं आहे.

एक काळ होता बॉलीवूडमध्ये देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार या तीन सुपरस्टार्सनी अक्षरश: इंडस्ट्रीवर गारुड घातलं होतं, स्टारडमचं तेच स्नप्न शाहरुख आमिर आणि सलमान प्रत्यक्षात आणलं..

बॉलीवूडचे स्टार्स

बॉलीवूडच्या सुपरस्टार्सची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात शाहरुख खान, सलमान खान आणि अगदी आमिर खानचीही नावे येतात. 

मात्र आमिर स्वत:ला स्टार मानत नाही. खरं तर, जेव्हा तो त्याच्या स्टारडमची शाहरुखशी तुलना करतो तेव्हा तो स्वतःला खूप कमी समजतो. 

शाहरुखचं कौतुक करताना आमिर म्हणाला

आमिरने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या आणि शाहरुख खानच्या स्टारडमबद्दल सांगितले होते. 

या मुलाखतीत आमिरने शाहरुखच्या मन्नतचं कौतुक करताना किंग खानच्या वॉर्डरोबचंही वर्णन केलं आहे. 

शाहरुखकडे मन्नतमध्ये असलेला वॉर्डरोब त्याच्या घराच्या आकाराचा असल्याचे आमिरने सांगितले होते. ही वॉर्डरोब पाहून आमिर आश्चर्यचकित झाला होता.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या वेळची आठवण

आमिर खान 2018 मध्ये याबद्दल बोलला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा आमिर त्याच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. तेव्हा आमिरने सांगितले होते की शाहरुख खानमुळे आकर्षित झाला होता. 

शाहरुखच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्सने तोही प्रभावित झाला होता. शाहरुखचा वॉर्डरोब किती मोठा आहे आणि त्यात कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे आमिरने सांगितले होते.

आमिर स्वत:ला स्टार समजत नाही

आमिर म्हणाला होता की तो स्वत:ला स्टार म्हणून पाहत नाही, पण शाहरुखला मोठा स्टार मानतो. आमिर म्हणाला होता की, शाहरुखची प्रत्येक गोष्ट मोठी आहे. तो खूप मोहक आणि देखणा आहे.

आमिरच्या घराइतका वॉर्डरोब

आमिरने सांगितले होते की तो शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यावर पहिल्यांदा गेला होता,हा बंगला तेव्हा अगदी नवीन होता. शाहरुख आमिरला वॉर्डरोब दाखवायला घेऊन गेला. आमिर म्हणाला होता, 'शाहरुखचा वॉर्डरोब माझ्या संपूर्ण घराइतका मोठा आहे.

सगळं काही व्यवस्थित

 त्याचे कपडे आणि टी-शर्ट अगदी व्यवस्थित होते. सर्व काही अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्यात आले होते. सूट, शूज, मोजे सर्वकाही अगदी व्यवस्थित ठेवले होते. त्याला बघून माझ्या तोंडून शब्द निघाले- वाह! हे स्टारचे घर आहे. माझं घर मात्र तसं नाही. माझ्याकडे सर्व गोंधळ आहे.

आमिर - शाहरुखचे वाद

आमिरने शाहरुखची स्तुती केली असली तरी दोघांना नेहमीच एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले गेले आहे. नंतर दोघांमध्ये अनेक मतभेद झाले. 

तेव्हा आमिरने शाहरुखबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. पण नंतर शाहरुख आणि आमिरमध्ये सर्व काही ठीक झाले. 2017 मध्ये झालेल्या दिवाळी पार्टीत दोन्ही स्टार्स एकत्र दिसले होते.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT