Amir Khan  Danik Gomantak
मनोरंजन

Amir Khan: मित्राच्या निधनानंतर अमीर भावुक, पोहोचला लगानच्या शूटिंग स्पॉटवर

Amir Khan: रोड अॅक्सिडंटमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोटई गावातील महावीर चाड यांच्या कुटुंबाचे त्यांनी सांत्वन केल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Amir Khan: लगान चित्रपटात लाइन प्रोड्यूसर म्हणून ज्यांनी काम केले होते ते महावीर चाड यांचे निधन झाले आहे. ते आमिर खान यांचे जवळचे मित्रदेखील होते. महावीर चाड यांच्या निधनानंतर आमिर खान गुजरातच्या कच्छला पोहोचला आहे. 21 जानेवारीला तो सुपर चार्टर्ड विमानाने भुजला पोहोचला. रोड अॅक्सिडंटमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोटई गावातील महावीर चाड यांच्या कुटुंबाचे त्यांनी सांत्वन केल्याची माहीती समोर आली आहे.

आमिर 'लगान' चित्रपटाचे शूटिंग झालेल्या ठिकाणालाही भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इथल्या शेतातच भुवन (आमिर) आणि त्याची टीम (बाकी कलाकार) सराव करत होती. अंतिम सामन्यासाठी सुमारे 10 हजार लोकांना आमंत्रित करून त्यांना 50 रुपये देण्यात आले.

नुकताच आमिर खान त्याची लाडकी मुलगी आयरा खानच्या लग्नात व्यस्त होता. मुंबईत नोंदणीकृत विवाह आणि उदयपूरमध्ये ख्रिश्चन विवाहानंतर एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक नामवंत स्टार्स सहभागी झाले होते. आता आयरा पती नुपूर शिखरेसोबत हनीमूनसाठी बाली येथे गेली आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान 'लाल सिंह चड्ढा' नंतर चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, तो 'चॅम्पियन' नावाचा सिनेमाची निर्मिती करत असल्याचे म्हटले जात आहे. आधी फरहान अख्तर यात असणार असल्याचं बोललं जात होतं, पण आमिर स्वतः अभिनय करणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गुलशन कुमार यांच्या बायोपिक 'मोगुल'मध्येही तो दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याच्या आगामी सिनेमांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT