Altaf Raja Dainik
मनोरंजन

Altaf Raja : प्रेमभंगाचं दु:ख मांडणारा अल्ताफ राजा पोट भरण्यासाठी कपडे शिवायचा....

'तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे' या अजरामर गाण्याचा गायक अल्ताफ राजा एकेकाळी जगण्याचा संघर्ष करायचा..

Rahul sadolikar

एक काळ होता जेव्हा प्रेमात पडण्यासाठी नदीम-श्रवण आणि प्रेमभंग झाल्यावर दु:खावेळी सोबत करण्यासाठी अल्ताफ राजाची गाणी यायची. आपल्या मोकळ्या आवाजाने दर्दी लोकांचा दर्द अजुन वाढवणारे गायक म्हणजे अल्ताफ राजा.

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला ज्याच्या गाण्यांनी रिझवलं.. नादावलं आणि प्रेम मोडलेल्यांनाही ज्याच्या गाण्यांनी मोठा आधार दिला, असा गायक म्हणजे अल्ताफ राजा..

एक काळ या गाण्यांनी गाजवला होता

एक काळ असा होता की लोक अल्ताफ राजाच्या गाण्यावर दिवसरात्र झिंगत असयचे. 'तुम तो ठहरे परदेसी' , 'जा बेवफा जा', 'आज की रात ना जा परदेसी' अशी किती तरी गाणी लोकांच्या ओठांवर असायची, आणि आजही ती गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.

 'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणं तर इतकं तुफान गाजलं की लोक या गाण्यासाठी वेडे झाले होते. अल्ताफ आणि त्यांच्या गाण्यांनी त्या काली अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

यश उशिरा मिळालं आधी केलं हे काम

यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अल्ताफनं एकेकाळी कपडे शिवायचे काम केले आहे. त्याचाच किस्सा त्याने एका मुलाखतीत सांगितला आहे. अल्ताफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या स्ट्रगल विषयी सांगत आहेत. ते म्हणतात की, ''मी नववी फेल आहे.. मी दहावी ही पास करू शकलो नाही. आईने त्यासाठी खूप प्रयत्न केले. प्रायव्हेट क्लास लावून मला दहावीत बसवलं पण मी काही पास झालो नाही.'

'पण माझे आई-वडील खूप चांगले होते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही की सक्ती केली नाही. ते फक्त इतकेच म्हणायचे.. तू काहीतरी कर.. ते म्हणायचे, आम्ही आहोत तोवर ठीक आहे. पण आमच्या माघारी तुझं कसं होणार..'

टेलरिंग शिकणं सुरू

'शेवटी त्यांनी मला दादर मध्ये टेलरिंग कॉलेज मध्ये पाठवलं.. जेणकरून काहीतरी कसब अंगी असावी. तिथे मी सगळं शिकलो. कपडे शिवू लागलो. अगदी त्यावेळी कपडा कापताना लागलेल्या कैचीचा व्रणही अजून माझ्या हातावर आहे.'

आता अल्ताफ राजा ग्लॅमरपासुन दूरच

हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. अल्ताफ यांनी आजवर अनेक म्युझिक अल्बमसाठी आपला आवाज दिला आहे. मात्र, गेल्या काही काळात त्यांचा कलाविश्वातील वावर बराच कमी झाला आहे.

असं म्हणतात की सध्याचेही त्यांचे जीवन पहिल्या सारखे तारांकित राहिलेले नाही. आता ते अगदी सामान्य माणसासारखे आयुष्य जगत आहेत.अल्ताफ राजा यांची गाणी तरुणांच्या प्रेमभंगाच्या वेळी साथ देतील आणि दु:ख सुरेल होईल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT