Rocky Aur Rani Ki Prem Kahani Dainik Gomantak
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'रॉकी और राणीच्या' ट्रेलरमधून संस्कृती, कुटुंब आणि प्रेमाची झलक

Alia Bhatt: दोघे एकमेकांच्या घरी तीन-तीन महिने राहायचे ठरवतात.

दैनिक गोमन्तक

Alia Bhatt: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता 'रणवीर सिंह' आणि 'आलिया भट्ट' यांची मुख्य भूमिका असलेला 'रॉकी और रानी की प्रेम' कहानी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून चित्रपटाच्या ट्रेलरने ही उत्सुकता आणखी वाढवली आहे.

आलिया भट्ट या चित्रपटात रानीची भूमिका निभावत असून रणवीर सिंह या चित्रपटात रॉकीची भूमिका निभावत आहे. रॉकी आणि रानी एकमेकांच्या प्रेमात पडतात. रॉकीला रानीसोबत लग्न करायचे आहे मात्र दोन्ही कुटुंब एकमेकांपासून वेगळे असल्याने आपल्या लग्नात अडचणी येऊ शकतात असे रानीला वाटते.

मात्र यावर उपाय म्हणून दोघे एकमेकांच्या घरी तीन-तीन महिने राहायचे ठरवतात. या सगळ्यात दोघांचे कुटुंब व्हिलन बनण्याचे काम करतात. आता त्याचे लग्न होणार की नाही, त्यांच्या नात्याच्या शेवट काय असेल कि कुटुंबामुळे त्यांना एकमेकांपासून दूर जावे लागेल हे चित्रपट रिलिज झाल्यानंतर समजणार आहे. मात्र आता ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

करण जौहर मोठ्या कालावधीनंतर रॉकी और रानी की प्रेम कहानी च्या माध्यमातून दिग्दर्शनात परतला आहे. चित्रपटाची कहानी इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहली आहे. धर्मा प्रोडक्शन आणि वायकॉम18 स्टूडियोज यांनी मिळून चित्रपट प्रोड्यूस केले आहे.

महत्वाचे म्हणजे, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांच्याशिवाय रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात धर्मेंद्र ,जया बच्चन, शबाना आजमी, अर्जुन बिजलानी, श्रद्धा आर्या, श्रिति झा, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, अर्जित तनेजा, नमित दास देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहेत.

2021 मध्ये घोषणा करण्यात आलेला हा चित्रपट 28 जुलैला चित्रपटगृहात रिलिज होणार आहे. आता चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT