Alia Bhatt and Ranbir Kapoors wedding got postponed, know what is the reason  Dainik Gomantak
मनोरंजन

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे शुभमंगल 'पोस्टपोन'

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. आतापर्यंत असे बोलले जात होते की दोघेही याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. पण आता नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांनीही आपलं लग्न पुढे ढकललं आहे.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर कपूर आपापल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. यासोबतच दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे आणि त्याची तयारी आणि व्यवस्थेसाठी खूप वेळ लागणार आहे, त्यामुळे आता पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघेही लग्न करणार आहेत.

अशीही बातमी आहे की लग्नाआधी किंवा नंतर आलिया आणि रणबीर एकत्र सुट्टीवर जाऊ शकतात. आता ही बातमी कितपत खरी आहे, हे येत्या काळातच कळेल कारण याआधी आलिया आणि रणबीर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची तारीख वाढवत असल्याची बातमी आली होती. विकी आणि कतरिनाचे डिसेंबरमध्ये लग्न होणार आहे आणि त्यांनी त्यांच्या मित्रांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे लग्न पुढे ढकलले.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. तसे, आलिया आणि रणबीर आपले नाते कोणापासूनही लपवत नाहीत. दोघेही खुलेपणाने एकत्र हँग आउट करतात, एकमेकांबद्दल बोलतात. आलिया सोशल मीडियावर रणबीरसोबतचे फोटो शेअर करत असते. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला तिच्या फोनचा स्क्रीनसेव्हर काय आहे असे विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने तिचा फोन दाखवला ज्यामध्ये तिचा आणि रणबीरचा फोटो होता. एका मुलाखतीदरम्यान रणबीर म्हणाला होता की, जर कोविड आला नसता तर त्याने आलियाशी लग्न केले असते. पण आता दोघेही मनमोकळेपणाने एन्जॉय करण्यासाठी वातावरण निवळण्याची वाट पाहत आहेत.

दोघांची प्रोफेशनल लाईफ

रणबीर आणि आलियाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर दोघेही ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय आलिया आरआरआर, गंगूबाई काठियावाडी, रॉकी आणि राणीची प्रेमकथा या चित्रपटात दिसणार आहे. तर रणबीर अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो लव रंजनच्या आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे, ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT