Akshay Kumar's new movie OMG 2  poster released
Akshay Kumar's new movie OMG 2 poster released Instagram /@akshaykumar
मनोरंजन

अक्षय कुमारच्या OMG 2 च पोस्टर रिलीज, खिलाडी कुमार दिसणार शिवाच्या अवतारात

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) दरवर्षी विवध विषय घेवून चित्रपट (Movie) बनवत असतो. तो एकाच वर्षात अनेक चित्रपट पूर्ण करतो. जेव्हा तो पुढच्या चित्रपटासाठी काम करत असतो तेव्हा सहसा त्याचे 2-3 चित्रपट रिलीजसाठी तयार असतात. बॉलीवुडचा खिलाडी कुमार लवकरच त्याच्या आगामी चित्रपटात शिवाची (Shiv) भूमिका साकारताना दिसणार आहे.

या पूर्वी अक्षय कुमारने तीच्या चित्रपटामध्ये कृष्णा ( Krishna) आणि 'लक्ष्मी' (Lakshmi) च्या भूमिका साकारताना दिसला आहे. त्याने 'ओह माय गॉड' (Oh My God) या चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने 'लक्ष्मी' या चित्रपटामध्ये लक्ष्मी नावाच्या ट्रान्सजेंडर भुताची भूमिका साकारली होती. आता तो 'ओह माय गॉड-2 ' या चित्रपटात शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. खिलाडी कुमारणे स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टर शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये भगवान शिव कोणाचा हात धरताना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये अक्षय कुमार शिवाच्या अवतारामध्ये दिसत आहे.अक्षय कुमारने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, कर्ता करे नही करता सके शिव करे सो होय. OMG2 ला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. समाजामधील एक महत्वाचा मुद्दा दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT