Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar ने मोडला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, 3 मिनिटांत केला 'हा' पराक्रम

Guinness World Records: अक्षयने 3 मिनिटांत जास्तीत जास्त सेल्फी घेण्याचा नवा विक्रम केला आहे.

Manish Jadhav

Akshay Kumar: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार त्याच्या आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'सेल्फी'च्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमारनेही एक विक्रम मोडला आहे. अक्षयने 3 मिनिटांत जास्तीत जास्त सेल्फी घेण्याचा नवा विक्रम केला आहे.

यापूर्वी, हा विक्रम अमेरिकेच्या जेम्स स्मिथच्या नावावर होता. अक्षय कुमारने (Akshay Kumar) तीन मिनिटांत 184 सेल्फी काढले, तर जेम्स स्मिथने तीन मिनिटांत 168 सेल्फी काढण्याचा विक्रम केला. सोशल मीडियावर अक्षय कुमारने पोस्टसोबत काही फोटोही शेअर केले आहेत.

सेल्फी रेकॉर्ड

अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'हा अनोखा विश्वविक्रम मोडताना आणि हा क्षण माझ्या चाहत्यांशी शेअर करताना मला आनंद होत आहे. मी आजवर जे काही मिळवले आहे आणि आजच्या क्षणी मी जिथे आहे ते सर्व माझ्या चाहत्यांच्या बिनशर्त प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आहे.'

तसेच, अक्षय कुमारने या पोस्टसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एकामागून एक व्यक्ती येतात आणि अक्षय त्यांच्यासोबत सेल्फी काढतो.

अक्षय-इमरान एकत्र दिसणार

इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच 'सेल्फी' चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. चित्रपटाची कथा एका सुपरस्टार आणि त्याच्या चाहत्यातील वैरावर आधारित आहे.

या चित्रपटाचे 2 ट्रेलर रिलीज झाले आहेत, पहिल्यामध्ये इमरानची कहाणी दाखवण्यात आली आहे, तर दुसऱ्यामध्ये अक्षय कुमारची कहाणी.

या दोघांसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा देखील आहे, जी इमरान हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 2023 मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट अक्षयचा या वर्षातील पहिला चित्रपट आहे.

गेले वर्ष अक्षय कुमारसाठी काही खास ठरले नाही, त्यामुळे 2023 मध्ये त्याची सुरुवात कशी होते हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT