Akshay Kumar Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar Controversy : अक्षय कुमारने भारताच्या नकाशावर ठेवला पाय युजर म्हणाले तुला लाज आहे का?

अभिनेता अक्षय कुमारने आता एक नवाच वाद निर्माण केला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'सेल्फी' आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Rahul sadolikar

Akshay Kumar New Contraversy: आजकाल चित्रपट आणि वाद विवाद हे समीकरण इतकं पक्कं झालं आहे की, एखादा नवीन चित्रपट येणार असेल तर साहजिकच त्यासोबत एखादा वाद हा जोडलेलाच असतो. आता यावेळी अक्षय कुमार(Akshay Kumar) वादात सापडला आहे.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार उत्तर अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे, परंतु त्याचा व्हिडिओ शेअर करणे अक्षय कुमारला महागात पडले. व्हिडिओ पाहून अक्षय कुमारचे चाहते त्याला वाईटरित्या ट्रोल करत आहेत आणि त्याला कॅनडाला जाण्यास सांगत आहेत

खरंतर अक्षय कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो दिशा पटनी, सोनम बाजवा आणि मौनी रॉयसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे स्टार्स पृथ्वीवर फिरताना दिसत आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अक्षय कुमारने भारताच्या नकाशावर पाऊल ठेवल्याचा दावा चाहते करत आहेत. आता यावर साहजिकच लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणार हे ओघाने आलंच.

आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारने लिहिले आहे की, 100 टक्के मनोरंजन होईल. उत्तर अमेरिकेतील शुद्ध देसी एंटरटेनमेंट. तुमचे सीट बेल्ट बांधा, आम्ही मार्चमध्ये येऊ.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्याला माफी मागायला आणि देशाचा आदर करायला सांगत आहेत. 

या कृत्याबद्दल तुम्ही करोडो देशवासीयांची माफी मागावी, असे एका यूजरने लिहिले आहे. त्याचबरोबर एका यूजरने लिहिले आहे की, भारताचा थोडा आदर करा. काही युजर त्याला कॅनेडियन कुमार म्हणत ट्रोल करत आहेत.

अक्षय कुमार भारतीय नसून त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने त्याच्या नागरिकत्वावरून त्याला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. जरी अक्षय मनापासून स्वतःला भारतीय म्हणत असला तरी युजर त्याला ट्रोल करण्याची कोणतीही संधी सोडण्यास तयार नाहीत.

अक्षय कुमारचा सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे . 'मैं खिलाडी' चित्रपटाचे पहिले गाणे प्रचंड गाजले, उद्या चित्रपटाचे दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT