Shaitaan Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Shaitaan Box Office Collection: आर.माधवन 'शैतान' बनून बॉक्स ऑफीसवर घालतोय धुमाकूळ

Shaitaan Box Office Collection: जाणून घेऊयात या चित्रपटाने रिलिज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Shaitaan Movie Box Office Collection Day 2

आर. माधवनसोबत 'शैतान' या चित्रपटातून अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवताना दिसत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाने रिलिज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे.

विकास बहल दिग्दर्शित शैतान या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी २७% अधिक व्यवसाय केला आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता रविवारी तिसऱ्या दिवशी हा चित्रपट 20 कोटींहून अधिकचा गल्ला जमवणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'शैतान' ने पहिल्या दिवशी 14.75 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 18.75 कोटींचा व्यवसाय केला. अशाप्रकारे दोन दिवसांत चित्रपटाचा देशभरात एकूण 33.50 कोटींचा व्यवसाय झाला आहे. रविवारी हा चित्रपट 50 कोटींच्या कमाईचा टप्पा सहज पार करेल असे म्हटले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, हॉरर चित्रपट बॉक्स ऑफीसवर इतकी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 60-65 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. दरम्यान, आर.माधवनच्या अभिनयाचे सगळीकडून कौतुक होताना दिसत आहे. आता या दोन दिग्गज अभिनेत्यांची मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT