Kartik Aaryan
Kartik Aaryan Dainik Gomantak
मनोरंजन

'भूल भुलैया 2'च्या यशानंतर कार्तिक आर्यन कबीर खान-साजिद नाडियादवालाच्या आगामी चित्रपटात दिसणार

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या त्याच्या करिअरच्या चांगल्या दिवसांमधून जात आहे. यापूर्वी तो भूल भुलैया 2 या चित्रपटात दिसून आला तर त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या यशानंतर आता कार्तिक आर्यनच्या हातात आणखी एका मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट आला आहे. तसेच हा दिग्दर्शक कबीर खान आहे. कबीर खानने एक था टायगर आणि 83 सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत तर साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले जात आहे. (After the success of Bhool Bhulaiya 2 Karthik Aryan will be seen in Kabir Khan Sajid Nadiadwala next)

कार्तिक आर्यनने स्वतः कबीर खान आणि साजिद नाडियादवालासोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तो अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. कार्तिक आर्यनने त्याच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा, कबीर खान आणि साजिद नाडियादवाला यांचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोसह त्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. कार्तिक आर्यनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे खूप खास आहे. माझे आवडते चित्रपट निर्माते कबीर खान आणि साजिद नाडियादवाला सर यांच्यासोबत हा रोमांचक प्रवास सुरू करण्यासाठी मी उत्सुक आहे. कार्तिक आर्यनची ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. साथीदार कमेंट करून त्यांच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांसोबत उत्सुकता व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे कबीर खान कार्तिक आर्यनसोबत सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: थिवी येथे पाच लाखांची घरफोडी

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT