Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Emergency नंतर कंगनाच्या पदरात आणखी एक राजकीय थ्रिलर! या दिग्दर्शकासोबत करणार काम

कंगना लवकरच दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut Emergency: सध्या अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान कंगनाच्या हातात आणखी एक प्रोजेक्ट आला आहे. ती लवकरच दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मधुर भांडारकर कंगना राणौतसोबत चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. हा एक राजकीय थ्रिलर चित्रपट असेल.

कंगना राणौतचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 'धाकड' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही . पण, यानंतरही कंगनाकडे कामाची कमतरता नाही. 'पेज 3' फेम दिग्दर्शक मधुर भांडारकर एक चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट दहशतवाद्यांनी मारलेल्या काश्मिरी गायकाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'बबली बाऊन्सर' नंतर हा चित्रपट महिलावर केंद्रित असेल. या चित्रपटात मधुर भांडारकरने कंगना राणौतला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले आहे. मधुर भांडारकर त्यांचा 'बबली बाऊन्सर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बनवणार असल्याचीही बातमी आहे. तमन्ना भाटिया भांडारकर यांच्या 'बबली बाऊन्सर' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तमन्नाशिवाय सौरभ शुक्ला देखील दिसणार आहे.

कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर ' इमर्जन्सी' 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. कंगना इंदिरा गांधींच्या भूमिकेत खूपच आकर्षक दिसते. कंगणाच्या या भूमिकेचे मोठे कौतूकही होत आहे. कंगनाने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 25 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT