Rakhi Sawant - Adil Durrani Dainik Gomantak
मनोरंजन

Adil Durrani On Rakhi Sawant: 'राखीची गुपितं जगासमोर आणणार' जेलबाहेर येताच आदिलचा राखीवर निशाना

Adil Durrani On Rakhi Sawant: मात्र त्यानंतर काही दिवसातच राखीने आदिलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते.

दैनिक गोमन्तक

Adil Durrani On Rakhi Sawant: राखी सावंत वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. राखीने आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्याला काही महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली होती. आता आदिलची दुर्रानीची सुटका झाली आहे.

आदिलने तुरुंगाबाहेर आल्यावर मोठे वक्तव्य केले आहे. 'माझ्यासोबत जे काही घडले ते वाईट होते. मी लवकरच प्रेस कॉन्फरन्स ठेवेन आणि माझ्यासोबत हे कसे, का घडले ते सर्व सांगेन. त्याबरोबरच राखीची सगळी गुपितं देखील संपूर्ण जगासमोर आणेन.' असे त्याने म्हटले आहे.

आदिलचे हे वक्तव्य सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरीदेखील त्याच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. जे करायचे ते लवकर कर नाहीतर राखी ( Rakhi Sawant )तुला गायब करेल असाही सल्ला काहीजणांनी त्याला दिला आहे.

दरम्यान, राखीने आदिल दुर्रानी बरोबर लग्नगाठ बांधली तेव्हा सोशल मिडियावर चर्चांना उधान आले होते. मात्र त्यानंतर काही दिवसातच राखीने आदिलवर घरगुती हिंसेचे आरोप लावले होते.

कॅमेरासमोर येत तिने सर्व जगाला आपल्यासोबत काय घडले, आदिल तिला कसा वागवतो आणि त्याने तिच्याशी पैशासाठी लग्न केल्याचे राखीने सांगितले होत. त्यानंतर आदिलला शिक्षा झाल्याचे दिसून आले. आता आदिल राखीची नेमकी कोणती गुपिते सांगणार आणि आदिलच्या या वक्तव्यावर राखी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT