Karthik Aryan, Allu Arjun, Amitabh Bachchan, Yash Dainik Gomantak
मनोरंजन

Liquor Advertisement: 'या' बड्या स्टार्संनी धुडकावून लावली धूम्रपानाची जाहिरात, कोट्यवधी रुपयांच्या ऑफरला मारली लाथ

Liquor Advertisement: बॉलिवूड असो की साऊथ इंडस्ट्री, इथे कलाकार त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त काही जाहिरातींमुळे चर्चेत असतात.

Manish Jadhav

Liquor Advertisement: बॉलिवूड असो की साऊथ इंडस्ट्री, इथे कलाकार त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त काही जाहिरातींमुळे चर्चेत असतात. प्रेक्षकांना ही जाहिरात आवडली तर ते या कलाकारांचे कौतुक करतात, पण त्याच प्रेक्षकांना ही जाहिरात आवडली नाही तर ते या कलाकारांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी मोठ्या रकमेची ऑफर देऊनही दारु आणि धूम्रपानाच्या जाहिराती करण्यास नकार दिला.

अल्लू अर्जून

त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त, साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील त्याच्या नियमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात असतो. काही दिवसांपूर्वी अल्लूने दारुची जाहिरात करण्यास नकार दिल्याची बातमी आली होती. ही जाहिरात करण्यासाठी त्याला 10 कोटींची ऑफर देखील देण्यात आली होती, परंतु तरीही अल्लूने ही डील करण्यास नकार दिला.

यश

'KGF 2' स्टार यश त्याच्या चित्रपटांमध्ये धूम्रपान आणि मद्यपान करताना दिसतो, परंतु वास्तविक जीवनात तो या सवयींच्या पूर्णपणे विरोधात आहे. अशा गोष्टींचा प्रचार करणे तो टाळतो. अल्लू व्यतिरिक्त यशने या गोष्टींच्या जाहिरातीसाठी करोडोंच्या ऑफर्सही सोडल्या आहेत. त्याच्या या निर्णयाचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले.

कार्तिक आर्यन

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Karthik Aryan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील खूप चर्चेत असतो. त्याला पान मसाला कंपनीने त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी करोडो रुपयांची ऑफर दिली होती, परंतु कार्तिकने ही ऑफर नाकारली आणि ब्रँडची जाहिरात करण्यास नकार दिला.

अमिताभ बच्चन

अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी गेल्या वर्षी एका शाळेला भेट दिल्यानंतर कोला ब्रँडचे समर्थन करणे थांबवले होते, असे सांगितले जाते. त्यांना एका मुलीने सांगितले की, तिच्या शिक्षकाने या गोष्टीचे वर्णन 'विष' असे केले, परंतु अमिताभ तिचे संपादन करतात. मात्र त्यांनंतर त्यांनी ब्रँडबरोबर असलेला करार मोडला. याशिवाय अमिताभ यांनी एका लिकर कंपनीच्या ब्रँडची जाहिरात करण्याची ऑफरही नाकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT