Vicky Kaushal In Upcoming Chavaa : अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी छावा या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वीची विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीकेत दिसणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
नुकताच विकीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्याने विकी छावासाठीच तयारी करत असल्याचा अंदाज बांधता येवू शकतो. चला पाहुया याबाबतचे सविस्तर वृत्त.
'जरा हटके जरा बचके' दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आता छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित पीरियड ड्रामा चित्रपटात काम करत आहेत.
'छावा' असे या चित्रपटाचे नाव असून यात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणार असून रश्मिका मंदान्ना येसूबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये याबद्दलचा उत्साह वाढत आहे.
अलीकडेच अक्षय खन्ना या चित्रपटात दाखल झाल्याची बातमी आली असतानाच आता विक्की कौशलने असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून त्याने 'छावा'ची तयारी सुरू केल्याचे दिसते.
विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या टीझरने चाहत्यांमध्ये अधिकच खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, विकी कौशलचे नुकतेच पोस्ट केलेले फोटो पाहता, अभिनेत्याने त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटाची तयारी सुरू केल्याचे दिसते. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. मात्र, अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.
खरं तर आज विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये विकी कौशल घोड्यावर स्वार होताना दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहून अभिनेत्याने 'छावा' चित्रपटाची तयारी सुरू केली असल्याचा अंदाज नेटिझन्स लावत आहेत. या चित्रपटात विकी कौशल मराठा योद्धाच्या भूमिकेत दिसणार असून अशा व्यक्तिरेखेसाठी घोडेस्वारी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. अशा स्थितीत चाहते याचा अंदाज घेत आहेत.
विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटात दिसला होता . चांगला रिव्ह्यू मिळूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
विकी कौशल पुढे 'सॅम बहादूर' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो फील्ड मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.