Actor Sathyaraj 69 th Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

बॉटनी विषयात ग्रॅज्युएट असणारा तरुण असा बनला अभिनेता...बाहुबलीच्या कटाप्पाची गोष्ट माहितेय का?

Rahul sadolikar

Actor Sathyaraj 69 th Birthday : आखीर कटप्पाने बाहुबली को क्यो मारा? हा प्रश्न काही वर्षांपूर्वी देशाला पडला होता. एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली चित्रपटांत कटप्पा ही गाजलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.

कटाप्पा ही गाजलेली व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते सत्यराज यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सत्यराज यांचा आज 69 वा वाढदिवस त्यानिमित्त पाहुया त्यांच्या अभिनयाचा प्रवास.

सत्यराज यांचे करिअर

सत्यराज हे मुख्यतः तमिळ अभिनेते असून त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांनी तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 3 ऑक्टोबर 1954 रोजी कोईम्बतूर येथे जन्मलेले सत्यराज 69 वर्षांचे झाले आहेत. 

चित्रपटांवरच प्रेम

सत्यराज यांनी आपल्या करिअरची सुरुवात नकारात्मक भूमिकांपासून केली. त्यांचे वडील सुब्बायन हे व्यवसायाने डॉक्टर होते.

 आपल्या मुलाने अभिनेता व्हावे अशी आई नथंबलची कधीच इच्छा नव्हती. पण एमजी रामचंद्रन आणि राजेश खन्ना यांचा जबरदस्त प्रभाव असल्याने सत्यराज यांना फक्त चित्रपटांमध्येच करिअर करायचं असं ठरवलं.

बॉटनी विषयात घेतली होती डिग्री

बॉटनी विषयातून पदवी घेतलेले सत्यराज 1976 मध्ये घर सोडून चेन्नईला आले. 1978-1982 पर्यंत ते चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसले. खलनायकाच्या गुंडांच्या टोळीत त्यांना छोट्या-छोट्या भूमिका मिळायच्या. 

1986 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 'रासिगन ओरु रसीगाई' होता. नव्वदीचे दशक सत्यराज यांच्यासाठी सर्वात खास होते. या काळात त्यांनी केवळ उत्तम हिट चित्रपटच दिले नाहीत तर कॉमेडीपासून रोमँटिकपर्यंत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या.

व्यक्तिगत आयुष्य

अभिनेते सत्यराज हे 2 मुलांचे वडील आहेत. 1979 मध्ये त्यांनी चित्रपट निर्माते मधमपट्टी शिवकुमार यांची भाची महेश्वरीशी लग्न केले. 

सत्यराज आणि माहेश्वरी कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मुलीचे नाव दिव्या आहे आणि मुलगा सिबिराज देखील अभिनेता आहे.

अमायधी पडई

1994 मध्ये रिलीज झालेल्या 'अमेधी पडई'चे मणिवन्नन दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा एका महत्त्वाकांक्षी आणि अप्रामाणिक माणसाची आहे जो चुकीच्या मार्गाने प्रमुख राजकारणी बनतो. त्यांचा एक अवैध मुलगा आहे, जो त्यांच्या मतदारसंघात पोलीस निरीक्षक म्हणून तैनात आहे.

वेधम पुथिथु

'वेधम पुथिथु' हा 1987 साली प्रदर्शित झालेला ड्रामा चित्रपट आहे. कथा एका गावाची आहे. गावातील प्रमुख एका मोठ्या अनाथ मुलाचे संगोपन करत आहे. भारतीराजाच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट त्या काळातल्या प्रेक्षकांनी स्वीकारला.

सत्यराज यांचं दिग्दर्शन

1995 मध्ये रिलीज झालेला 'विलाधी खलनायक' सत्यराज यांनी स्वतः लिहिला आणि दिग्दर्शित केला होता.

 एवढेच नाही तर त्याने या चित्रपटात तीन वेगवेगळ्या भूमिकाही साकारल्या आहेत. या चित्रपटात सत्यराजसोबत नगमा आणि राधिकाही आहेत

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT