Imran Hashmi - salman khan viral video  Salman - imran hashmi
मनोरंजन

इम्रान हाश्मीला चक्क सलमाननेच केलं किस... व्हिडीओ व्हायरल

अभिनेता इम्रान हाश्मी हा सिरीयल किसर म्हणून ओळखला जातो पण एका प्रमोशन दरम्यान भाईजान सलमान खाननेच किस केलं आहे.

Rahul sadolikar

Imran Hashmi - salman khan viral video : इम्रान हाश्मी हा अभिनेता बॉलीवूडचा सिरीयल किसर म्हणून ओळखला जातो. मर्डर, अक्सर, जेहर अशा अनेक चित्रपटांमुळे इम्रान हाश्मीची प्रतिमा अधिक गडद झाली. इम्रानला एका प्रमोशनदरम्यान अभिनेता सलमान खानने किस केले आणि बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. नेमकं काय घडलं या प्रमोशनदरम्यान चला पाहुया

टायगर 3

सलमान खान - इमरान हाश्मी - कतरिना कैफ यांचा टायगर 3 सिनेमा आज बॉक्स ऑफीसवर चर्चेत आहे. सलमान खानचा टायगर 3 सिनेमाचा काल मुंबईत एक इव्हेंट पार पडला.

टायगर 3 च्या इव्हेंटला सलमान - कतरिना - इमरानचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला. यावेळी समोर असलेल्या प्रेक्षकांशी बोलता बोलता सलमानने इमरान हाश्मीसोबत असं काही केलं की, कतरिना पाहतच राहिली. पाहा व्हिडीओ.

व्हिडीओ व्हायरल

सलमान - कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सलमान म्हणतोय, - "कतरिना या चित्रपटात असल्याने झोया आणि टायगरमध्ये थोडा रोमान्स आहे." पण जर इम्रानने आतिशची भूमिका केली नसती तर मी तुम्हाला खात्री देतो की हे घडले असते.

सलमानने केलं किस

असं म्हणताच सलमानने इम्रानला पकडून त्याच्या किसिंग स्टाईलची नक्कल केली, जे पाहून कतरिना कैफ आणि तिथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात हसायला लागले. नंतर सलमान खान म्हणतो - "मला ही सवय (किसिंग सीन देण्याची) कधीच नव्हती, पण मला वाटते की इमरान हळूहळू ही सवय सोडत आहे." हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली आणि मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान, हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे.

हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला टायगर 3 ने आतापर्यंत 200 कोटींची कमाई केलीय.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT