Rami Reddy Dainik Gomantak
मनोरंजन

Rami Reddy : प्रेक्षकांना धडकी भरवणाऱ्या या व्हिलनचा शेवट खूप वाईट झाला होता...

अभिनेता रामी रेड्डी यांनी साकारलेली पात्रं आजही प्रेक्षकांना धडकी भरवतात.

Rahul sadolikar

बॉलीवूडमधील भयंकर खलनायकांबद्दल बोलताना कुणी 'अण्णा' आणि 'कर्नल चिकारा' यांना कसे विसरेल. अशा स्फोटक आणि भयानक खलनायकाची भूमिका साकारणारे रामी रेड्डी आता या जगात नाहीत. प्रेक्षकांच्या काळजाला धडकी भरवणारा हा अभिनेता शेवटच्या काळात कुणाला ओळखताही आले नाही इतक्या वाईट अवस्थेत होते. चला पाहुया रामी रेड्डी यांच्या करिअरचा प्रवास आणि त्यांचा भयंकर शेवट

'कर्नल चिकारा' आणि 'अण्णा' ही पात्रं अजरामर करणारा अभिनेता

बॉलिवूडमध्ये 'गब्बर', 'शकल'पासून 'बिल्ला' आणि 'मोगॅम्बो'पर्यंत अनेक भयानक खलनायक झाले आहेत. पण तुम्हाला 90 च्या दशकातील चित्रपटातील 'अण्णा' आठवतो का? होय, आम्ही 'कर्नल चिकारा' उर्फ ​​रामी रेड्डीबद्दल बोलत आहोत, ज्याने चित्रपटांमध्ये खूप मारहाण आणि रक्तपात घडवला. त्यांनी या जगाचा कसा निरोप घेतला आणि त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांची स्थिती काय होती चला पाहुया.

रामी रेड्डी यांचं खरं नाव

रामी रेड्डी यांचे पूर्ण नाव गंगास्वामी रेड्डी होते, त्यांचा जन्म १ जानेवारी १९५९ रोजी झाला होता. तो असा अभिनेता होता ज्याने हिंदी व्यतिरिक्त तेलुगु, तमिळ, भोजपुरी आणि मल्याळम सिनेमांमध्ये खूप काम केले.

रामी रेड्डी यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले. पण त्यांना लोकप्रियता मिळाली ती नकारात्मक भूमिकेतून.

पत्रकार ते व्हिलन

रामी रेड्डी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ते आंध्र प्रदेशातील चित्तूरचे आहेत. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. रामी रेड्डी चित्रपटात येण्यापूर्वी पत्रकार म्हणून काम करायचे. 

त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि चित्रपटांमध्ये करिअरला सुरुवात केली. रामी रेड्डी यांना 'अंकुशम' फेम सुपरहिट चित्रपटात 'स्पॉट नाना'ची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले.

Rami Reddy

रामी रेड्डी यांचे या चित्रपटांची चर्चा झाली

रामी रेड्डी यांच्या प्रसिद्ध पात्रांबद्दल बोलायचे तर ते अनेक आहेत. वक्त हमारा है मधील कर्नल चिकारा, 420 मधील रांका, दिलवाले मधील गुन, बॉडीगार्ड मधील वेलू, लोहा मधील टाकला, दादा पासून यशवंत 'अंजी' मधील 'गुरुजी' बनल्यापासून त्यांनी लोकांना खूप घाबरवले आहे.

सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार

1989 मध्ये अंकुसम या चित्रपटासाठी रामी रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट खलनायक नंदी पुरस्कार मिळाला होता. रामी रेड्डी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील चमकदार कामामुळे लोकांचे खूप मनोरंजन केले परंतु शेवटच्या दिवसात त्यांची प्रकृती बिघडली होती.

 आजारपणामुळे ते खूप बारीक झाले होते आणि त्यांना ओळखणे कठीण होते. 24 एप्रिल 2001 रोजी यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांना तीन मुले आहेत. ज्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT