अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी एकदा दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना 'घटिया अभिनेता' म्हटले होते. हे ऐकून राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) खूप नाराज झाली होती. त्यांच्या या वक्तव्यावर ट्विंकल म्हणाली होती की, 'जर तुम्ही एखाद्या हयात असणाऱ्या व्यक्तीचा आदर करु शकत नसाल, तर किमान या जगातून गेलेल्या व्यक्तीचा तरी तुम्ही आदर करु शकता.' यानंतर नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावरही सलीम खान यांनीही आक्षेप घेतला होता. ''राजेश खन्ना हे त्यांच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. त्याच्या घराबाहेर इतकी गर्दी मी कधीच पाहिली नाही. तो त्याच्या काळातील पहिला आणि शेवटचा सुपरस्टार होता,'' असही खान यांनी म्हटले होते. (Actor Naseeruddin Shah Had Called The Iate Actor Rajesh Khanna A Bad Actor)
दरम्यान, या घटनेनंतर नसीरुद्दीन शाह यांनी राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आणि मला त्यांच्या भावना दुखावायच्या नाहीत असेही म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी नसीरुद्दीन शाह यांच्यावरही टीका केली होती. नसीरुद्दीन यांना यशस्वी लोक आवडत नाहीत, अशी बोचरी टीका शहा यांच्यावर अख्तरांनी केली होती. त्यांनी दिलीप कुमारपासून अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांना शिव्याशाप दिले आहेत.
किंबहुना नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या एका मुलाखतीत 70 चे दशक हे मध्यम हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीचे दशक असल्याचे म्हटले होते. ते पुढे म्हणाले होते की, ''हिंदी चित्रपटांमध्ये साहित्यिक चोरीची सुरुवात 70 च्या दशकात झाली यामध्ये संगीत, पटकथा लेखन, कथा, अभिनयापासून पायरसीपर्यंत सर्व काही. हाच तो काळ होता जेव्हा राजेश खन्ना यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सर्व यश आणि स्टारडम असूनही मी त्यांना 'घटीया' अभिनेता मानतो.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.