KK Goswami's Car Catches Fire Dainik Gomantak
मनोरंजन

KK Goswami's Car Catches Fire : शक्तिमान फेम या अभिनेत्याच्या चालत्या कारला आग...

अभिनेता के.के गोस्वामी यांच्या चालत्या कारला आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांचा मुलगा कार चालवत होता.

Rahul sadolikar

'शक्तिमान', 'गटर गू'सह इतर टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता केके गोस्वामी एका मोठ्या घटनेतून थोडक्यात बचावला. मुंबईत त्यांच्या कारला आग लागली आणि ती त्यांचा 21 वर्षांचा मुलगा नवदीप चालवत होता. 

ही घटना शहराच्या मध्यभागी असलेल्या एसव्ही रोडवर घडली, जेथे केके गोस्वामी यांचा मुलगा कारने आपल्या घरातून फिल्मिस्तान स्टुडिओजवळ कॉलेजकडे जात होता. या घटनेमुळे सध्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. हे कसे घडले हे त्याला समजू शकलेले नाही

मिळालेल्या माहितीनुसार, नवदीप कार चालवत असताना अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. केके गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला. 

त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्या कारला आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.

केके गोस्वामीबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे खरे नाव कृष्णकांत गोस्वामी आहे. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे.

 त्यांच्या 'शक्तिमान', 'गटर गू', 'ज्युनियर जी', 'भाभी जी घर पर हैं', 'शका लका बम बम', 'सीआयडी', 'चक्रवर्ती अशोक सम्राट' आणि इतर शोजना ओळख मिळाली आहे.

केके गोस्वामी हे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अभिनेता होण्यापूर्वी तो गावात स्टुडिओ चालवत असे. 3 फुट उंची असणाऱ्या केके गोस्वामी यांनी मुंबईत आल्यानंतर खूप संघर्ष केला. 

तो एका बिअर बारमध्ये काम करत होता आणि येथेच त्याचा एका रक्षकाने दंडुका घेऊन पाठलाग केला होता.एक काळ असा होता जेव्हा त्यांनी पाणी पिऊन वेळ काढली आहे, पण आज ते एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT