Abhishek Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

Abhishek Kumar: 'हर हर महादेव' च्या जयजयकारात अभिषेकचे घरात जंगी स्वागत; चाहते म्हणाले-जिंकला नाहीस तरी...

Abhishek Kumar: देशभरातून त्याला चांगला सपोर्टही मिळत होता मात्र बाजी मुनव्वरने मारली आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली.

दैनिक गोमन्तक

Abhishek Kumar: बिग बॉसचा १७ वा सीझन नुकताच संपला असून मुनव्वर फारुकीच्या रुपात या पर्वाचा विजेतादेखील मिळाला आहे. आता शो संपला असला तरी स्पर्धक मात्र चांगलेच चर्चेत आहेत. बिग बॉसचा १७ वा सीझनमधील अभिषेक कुमारने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

असे म्हटले जात होते की, अभिषेक कुमार हा शो जिंकणार आहे. देशभरातून त्याला चांगला सपोर्टही मिळत होता मात्र बाजी मुनव्वरने मारली आणि ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता अभिषेक जेव्हा तीन महिन्यानंतर घरी आला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याचे जंगी स्वागत केले आहे. आईने आरती ओवाळून तर वडीलांनी त्याची नजर काढून, हर हर महादेव च्या जयजयकारात त्याचे घरात स्वागत केले आहे.

बिग बॉसच्या घरात अभिषेक पहिल्या दिवसापासून होता. या घरात अनेक स्पर्धकांबरोबर त्याचे वादविवाद पाहायला मिळाले होते. ईशा आणि समर्थबरोबरच्या त्याच्या समीकरणांमुळे तो चर्चांचा भाग बनला होता. मात्र त्याने ज्याप्रकारे बिग बॉसच्या घरात गेम खेळला, आपली मैत्री निभावली, भांडणे केली ते सगळे खरे होते, त्यामुळे तोच विजेता होणार असल्याचे लोक म्हणताना दिसत होते. आतादेखील त्याने ट्रॉफी जिंकली नसली तरीही त्याने प्रेक्षकांची मने जिंकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुनव्वर फारुकीने बिग बॉसच्या १७ व्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे तर अभिषेक फर्स्ट रनरअप राहिला आहे. मन्नारा चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर तर अंकिता लोखंडेला चौथ्या क्रमांकावरुन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Rashi Bhavishya 21 August 2025: निर्णय घेताना सावध राहा,आर्थिक लाभाची शक्यता; महत्वाची कामे पूर्ण होतील

गोवा काँग्रेसने काळे झेंडे दाखवले, निषेध केला; त्याच सुदर्शन रेड्डींना इंडिया आघाडीने दिली उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

SCROLL FOR NEXT