Big Boss 16 Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss 16 : अब्दु रोजिकने प्रियांका आणि टीनाला मागे टाकत मारली बाजी..टॉप 5 मध्ये मिळवलं पहिल्या क्रमांकावर स्थान

बिग बॉस 16 च्या टॉप 5 स्पर्धकांची नावं जाहीर झाली असुन यात अब्दु रोजिकने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे

Rahul sadolikar

बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांची नावं जाहीर झाली असुन त्यात फॅन्सच्या लाडक्या अब्दु रोजिकने बाजी मारली आहे. त्याने प्रियांका आणि टीनाला मागे टाकत टॉप 5 च्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत अब्दु रोजिकने प्रियांका चौधरीलाही मागे टाकले आहे. प्रियांकावर नेहमी इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करण्याचा आरोप केला जातो.

मागच्या एका एपिसोडमध्ये अब्दु रोजिकला काही काळ शोमधुन बाहेर पडावं लागेल असं सांगितलं तेव्हा सगळे स्पर्धक भावुक झाले होते. अब्दु रोजिक काही काळ बाहेर जाणार हे कळताच सगळ्याच स्पर्धकांना वाईट वाटलं होतं. इतकंच नाही तर काही प्रेक्षकांनाही अब्दु रोजिक काही काळसुद्धा शोच्या बाहेर पडणं आजिबात आवडलं नाही.

अब्दु रोजिक हा बिग बॉसच्या घरी आल्यापासुन सगळ्यांचा लाडका झाला. अगदी सलमानसुद्धा अब्दुच्या क्युटनेसचा चाहता आहे.

आता अब्दुने ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या पॉप्युलरिटीच्या यादीत स्ठान मिळवले आहे. आणि नुसते स्थान मिळवले नाही तर या यादीत आपलं पहिलं स्थान पक्कं केलं आहे. या यादीतल्या दुसऱ्या स्थानावर एमसी स्टॅन, तिसऱ्या स्थानावर प्रियांका चौधरी, चौथ्या स्थानावर शिव ठाकरे तर पाचव्या स्थानावर शालिन भनोट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT