Aamir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

मिस्टर परफेक्शनिस्ट चाहत्यांना देणार गूड न्यूज, ''IPL मध्ये संधी आहे का?''

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानने (Aamir Khan) आज एका व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

दैनिक गोमन्तक

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानने आज एका व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. ज्यामध्ये आमिरने खुलासा केला की, मी 28 एप्रिल रोजी सर्वांसोबत एक खास 'कहानी' शेअर करणार आहे. आमिर खानच्या (Aamir Khan) प्रॉडक्शन हाऊसने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना दिसू शकतो, ज्याबद्दल आपल्या मनात लगेच लगान चित्रपटाची (Movies) आठवण तरळेल. व्हिडिओमध्ये आमिर 28 एप्रिलला एक गोष्ट सांगण्याचे वचन देतो. त्याचा कहाणी सांगण्याचा उत्साह पाहून आजूबाजूचे खेळाडू मोठ्याने 'हो' म्हणतात! (Aamir Khan may release big news on April 28 Watch the viral video)

तसे पाहता, आमिर खान क्वचितच चाहत्यांशी संवाद साधतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची आणि चित्रपट रसिकांची उत्सुकता आणखीनच वाढते. परंतु वास्तविक ही गोष्ट आहे की, चित्रपटाशी निगडीत कथांपासून ते वैयक्तिक रोलपर्यंत आमिर बारीक विचार करतो. आमिर खानच्या अलीकडील व्हिडिओने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे, खरं तर, 28 एप्रिल रोजी आमिर कोणती गूड न्यूज देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मुलासोबत आंब्याचा आस्वाद घेतला

आमिर खानचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तो मुलगा आझादसोबत आंबा खात आहे. सध्या आंब्याचा हंगाम आहे. आमिरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो पोस्ट केले आहेत. यानंतर आमिरने यावेळी रमजानमध्ये उपवास न केल्याचे पाहून काही चाहते खूश झाले तर काहींना धक्का बसला. यावर काही लोकांनी त्याला ट्रोलही करायला सुरुवात केली. दुसरीकडे मात्र, आमिरने या सर्व गोष्टींना उत्तर देणे योग्य मानले नाही. आमिरनेही आरआरआर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. त्यासाठी तो दिल्लीलाही गेला आणि मुंबईत झालेल्या सक्सेस पार्टीत आमिरनेही सहभाग घेतला. सध्या लोक आमिरच्या कहाणीची वाट पाहत आहेत, ज्याचे वचन त्याने 28 एप्रिलला दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT