Goa IFFI Theme 2024 Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI Goa 2024: यंदाचा ईफ्फी सोहळा खास; शिग्मो अन् कार्निवलवर आधारित थीम परेड

IFFI theme based Shigmo & Carnival Parade: 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिग्मा आणि कार्निवल थीमवर आधारित फ्लोट परेड सादर केला जाईल

Akshata Chhatre

Special Theme based Shigmo & Carnival Parade for IFFI 2024

पणजी: यंदा इफ्फीच्या निमित्ताने ईएसजी ते कला अकादमी पणजी पर्यंत रोड परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिग्मा आणि कार्निवल थीमवर आधारित फ्लोट परेड सादर केला जाईल.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) रोजी सर्व शासकीय विभागांसोबत राज्यात होणाऱ्या 55व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आढावा घेणारी बैठक घेतली आणि या बैठकीमधून 15 नोव्हेंबरपर्यंत इफ्फीची सर्व कामे पूर्ण होतील व त्यांनतर 18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.

इफ्फीसाठी यंदा चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. शनिवार (दि. 2 नोव्हेंबर) पर्यंत महोत्सवासाठी तब्बल 3,659 जणांनी नोंदणी केली. इफ्फीबद्दल अनेकांच्या मनात आकर्षण असते त्यामुळे यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे.

20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या चित्रपट महोत्सवाची सध्या गोव्यात जय्यत तयारी सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याच्या कामाने जोर पकडला आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने इफ्फीची सुरुवात

यंदा गोव्यात इफ्फीचे उद्घाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT