सत्तेमध्ये असलेल्या एक महिलेविषयी राजकीय नाट्य, ‘प्रॉमिसेस’ (Les Promesses) या चित्रपटात घडते. ही महिला एकीकडे सत्तेच्या एकएक पायऱ्या चढत जाताना अनेक द्वंद्वांचे प्रसंग येतात. अनेक मागण्यांना तिला सामोरे जावे लागते. अशावेळी नैतिकतेचे मुद्देही संकट बनून तिच्यासमोर येतात. तर दुसरीकडे तिला निवडून देणाऱ्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची तिची अगदी मनापासून इच्छा असते. शक्ती आणि चारित्र्य यांच्यामध्ये गुंतागुंत वाढत जाते. दिग्दर्शक थॉमस क्रुथॉफ यांच्या ‘प्रॉमिसेस’ या चित्रपटात प्रेक्षकही तितकेच गुंतून जातात. त्यांचा चित्रपट पाहणाऱ्याला व्यापून टाकतो. या चित्रपटाचा 52 व्या इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शन करण्यात आले. जागतिक पॅनोरमा विभागात या चित्रपटाचा प्रीमियर झाला.
गरिबी, बेरोजगारीशी लढा
‘चित्रपटाच्या नायिकेने नेहमीच गरिबी, बेरोजगारी यांच्याशी लढा दिला आहे. तथापि, ज्यावेळी सत्तेची आकांक्षा जागृत होते, त्यावेळी ती त्यामध्ये अडकून पडते. तिला सत्ता तर हवी आहेच, परंतु त्याचवेळी तिला आपली एकनिष्ठतेची प्रतिमाही ढळू द्यायची नाही. बाहेरून शांत दाखवत असली तरी तिच्या मनाला आतून शांतता नाही. राजकीय क्षेत्रात महिला कधीच शांत राहू शकत नाही,’ असे ‘प्रॉमिसेस’च्या दिग्दर्शकांनी यावेळी नमूद केले.
फ्रेंच अभिनेत्री (French actress) इसाबेल हुपर्ट (Isabelle Huppert) हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. पॅरिसजवळच्या क्लेमेन्स शहराची निर्भय महापौर अशी तिची भूमिका आहे. तिला शहरातल्या नागरिकांच्या समस्यांची चांगली जाण आहे. महापौर म्हणून आपल्या कारकिर्दीचा अखेरचा टप्पा पूर्ण होणार असतानाच मंत्रिपद आपल्याला मिळू शकते, असे नायिकेला लक्षात येते आणि तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना अंकुर फुटतात. आणि मग मात्र सत्तेच्या हिंदोळ्यावरची आंदोलने तिला जाणवू लागतात. तिची कोंडी व्हायला लागते. नाव कसे दिले? दिग्दर्शक क्रुथॉफ म्हणाले, राजकारणामध्ये वचनांच्या आधारेच मते मिळवतात. चित्रपटात दररोज घडणारे राजकारण दाखवले आहे. यातील पात्रे कोणत्याही वैचारिक बाबतीत कमी आणि पैसा, पदे आणि पदानुक्रम यांच्याविषयीच जास्त बोलतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.