3 idiots Dainik Gomantak
मनोरंजन

3 Idiots: 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल येणार? अभिनेता म्हणाला आमिरसोबत पून्हा काम करण्यास...

3 Idiots: मात्र त्यावर काम करण्याची गरज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

3 Idiots: आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन आणि करिना कपूर यांचा 2009 मध्ये रीलीज झालेला 3 इडियट हा चित्रपट चांगलाच गाजला होता. राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात बोमन ईरानी आणि ओमी वैद्यदेखील दिसून आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून थ्री इडियटच्या सिक्वेलची चर्चा होताना दिसत आहे. आता अभिनेता शरमन जोशीने यावर मोठे भाष्य केले आहे.

शरमन जोशी सध्या त्याच्या कफास या वेब सीरीजमध्ये दिसून येत आहे. प्रमोशनच्या मुलाखतीदरम्यान शरमन जोशीने थ्री इडियटच्या सीक्वेलविषयी वक्तव्य केले आहे. शरमन जोशीने म्हटले आहे की, राजकुमार हिराणी थ्री इडियटचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे काही आयडियादेखील आहेत मात्र त्यावर काम करण्याची गरज आहे.

आर माधवन आणि आमिर खान य़ांच्याबरोबर पून्हा काम करण्यास उत्सुक असल्याचेदेखील शरमन जोशीने म्हटले आहे.

दरम्यान, कफस ही 6 वर्षाच्या बालकलाकारावर आधारित आहे. हा बालकलाकार सेक्शुअल अॅब्युसला बळी पडला आहे. या वेब सीरीज मध्ये शरमन जोशी या मुलाच्या वडीलांच्या भूमिकेत आहे.

कफस ही अशा कुटुंबाची कहानी जी एका संकटात अडकते गप्प बसण्यासाठी आणि खोटे बोलण्यासाठी पैसे घेते. कफसची कहानी एका भावनिक मुद्याला स्पर्श करते. संपूर्ण गोष्ट कास्टिंग काऊच आणि चाइल्ड अॅब्युसवर भोवती फिरताना दिसते. 6 एपिसोड असलेली ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव वर स्ट्रीम होत आहे. कफसमध्ये शरमन जोशी बरोबर प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंग देखील दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT