Irrfan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

16 वर्षांचा Irrfan Khan दूधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता

इरफान खान असा पठाण होता ज्याने कधीच मांस सेवन केले नाही. म्हणून त्याचे वडील त्याला गमतीने...

दैनिक गोमन्तक

ज्या दिवशी स्टार इरफान खानने मनोरंजन जगताला निरोप दिला त्या दिवशी बॉलीवूड कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती . 29 एप्रिल 2020 रोजी इरफान खानने अखेरचा श्वास घेतला . त्याच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. इरफानला जाऊन दोन वर्षे उलटून गेली, पण त्याचे चाहते आजही त्याची आठवण तितक्याच श्रद्धेने करतात. आज इरफान खानची पुण्यतिथी आहे, त्यामुळे अभिनेत्याचे चाहते त्याची आठवण काढत आहेत. तुम्हाला माहीत आहे का इरफान खान असा पठाण आहे कधीच मांस सेवन केले नाही. म्हणून त्याचे वडील त्याला गमतीने 'ब्राह्मण' म्हणायचे. इरफान खान अतिशय साध्या स्वभावाचा होता, ग्लॅमरच्या दुनियेत आल्यानंतरही त्याने आपले साधेपन जपले. मुस्लिम पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. वडील जहागीरदार खान हे व्यवसायाने टायर व्यावसायिक होते. (Irrfan Khan Death Anniversary)

जेव्हा 16 वर्षांचा इरफान दूधवाल्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता

इरफान खानने एकदा सांगितले होते की तो वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडला होता. एका मुलाखतीत त्याने या प्रसंगाचा उल्लेख केला होता. आईला विचारून खास दूध आणायला जात असे, त्यामुळे इरफानला दूधवाल्याच्या मुलीलाही बघता यायचे आणि घरी दूधही यायचे. पण इरफानचे ते पहिले प्रेम त्यावेळी पूर्ण होऊ शकले नाही. खरं तर ती मुलगी इरफानवर नाही तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होती. इरफानने जेव्हा एक दिवस हिम्मत करून आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा त्या मुलीने इरफानला एक पत्र दिले होते. तिच्या प्रियकराने तिला लिहिलेले हे पत्र होते. त्यानंतर इरफानचे मन दुखावले आणि तो त्या मुलीच्या प्रेमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला.

एक गोष्ट इरफानला अजिबात आवडली नाही

इरफान खान अतिशय साधे व्यक्तिमत्त्व होते. इरफानच्या कुटुंबातून अनेकदा त्याची पत्नी सुतापा आणि मुलगा बाबिल नेहमी इरफानच्या आठवणी शेअर करत असतात. चाहतेही त्याचे डायलॉग मोठ्या उत्सुकतेने ऐकतात. अलीकडेच अभिनेता इरफानची पत्नी सुतापा हिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने उघड केले आहे की इरफानला एका गोष्टीचा खूप तिरस्कार होता तो म्हणजे पत्ते खेळणे. इरफानला पत्ते खेळणे किंवा बघणे आवडत नव्हते. त्याच्या पत्नीने सांगितले की, जेव्हा तो आजारी होता आणि शूटिंगमध्ये व्यस्त होता, तेव्हा अनेकदा लोक सेटवर पत्ते घेऊन बसायचे, त्यावेळी इरफान तिथून उठून पुस्तक वाचायला जायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

SCROLL FOR NEXT